

India's Akashteer System
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा सूड म्हणून भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने अनेक भारतावर ड्रोन्स आणि मिसाईल्सद्वारे हवाई हल्ला.
तथापि, हे हवाई हल्ले भारतीय संरक्षण दलांनी हवेतच निष्प्रभ केले. 9-10 मेच्या रात्री पाकिस्तानने भारतावर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले होते. परंतु भारताच्या स्वदेशी 'आकाशतीर' प्रणालीने हे सर्व हल्ले रोखले.
भारताच्या या स्वदेशी बनावटीच्या आकाशवीर सिस्टिममुळे पाकिस्तान अचंबित झाला असून जग थक्क होऊन पाहत आहे. काय आहे ही सिस्टिम आणि तिची वैशिष्ट्ये याविषयी सविस्तर जाणून घेऊया...
शत्रूंच्या क्षेपणास्त्रांपासून संरक्षण: आकाशतीरने पाकिस्तानच्या ड्रोन, मिसाईल्स, मायक्रो UAVs आणि लोईटर म्युनिशन यांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करू दिला नाही.
पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान: ही प्रणाली 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमाचा उत्कृष्ट नमुना आहे. याच्या तुलनेत पाकिस्तानकडे चीनच्या HQ-9 आणि HQ-16 प्रणाली आहेत, ज्या भारतीय हल्ल्यांना थोपवू शकल्या नाहीत.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निर्णय: आकाशतीर प्रणाली विविध डेटा फीड्स – हवामान, भूभाग, रडार इंटरसेप्ट्स इत्यादी – एकत्र करून रिअल टाइममध्ये निर्णय घेते. हल्ल्यांचे मार्ग बदलते व स्वयंचलितपणे हल्ले करते.
पूर्णपणे स्वयंचलित प्रणाली: आकाशतीर नियंत्रण कक्ष, रडार्स व एअर डिफेन्स गन्स यांना एकाच वेळी रिअल-टाइम माहिती पुरवते. त्यामुळे समन्वयित हवाई संरक्षण शक्य होते.
C4ISR फ्रेमवर्कचा भाग: ही प्रणाली 'कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन, कॉम्प्युटर्स, इंटेलिजन्स, सर्व्हेलन्स आणि रिकॉनिसन्स' प्रणालीचा भाग आहे, जे युद्धातील आधुनिक बुद्धिमान व्यवस्थापन दाखवते.
मानवी हस्तक्षेपाशिवाय निर्णय: पारंपरिक प्रणाली मानवद्वारे चालविल्या जातात, पण आकाशतीर कमी उंचीवरील हवाई हालचाली ओळखून लगेच निर्णय घेते आणि शस्त्र प्रक्षेपण करते.
धोरणात बदलाचे संकेत: भारताची ही प्रणाली केवळ बचावापुरती मर्यादित नाही. ही आता दहशतवादाच्या मूळावर प्रहार करणाऱ्या धोरणाचे प्रतीक आहे.
मोबाईल व लवचिक: ही प्रणाली वाहनाधारित असल्यामुळे ती युद्धभूमीत सहज हलवता येते. यामुळे शत्रूच्या हल्ल्याला त्वरीत प्रत्युत्तर देता येते आणि मैत्रीपूर्ण विमानांना सुरक्षितता मिळते.
जगभर कौतुक: आकाशतीरमुळे भारत आता पूर्णपणे स्वयंचलित आणि एकात्मिक हवाई संरक्षण क्षमता असलेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. तज्ज्ञांनी याला "युद्धसामरिक धोरणात भूकंपासारखा बदल" अशा शब्दात गौरविले आहे.
आकाशतीरमुळे भारताच्या संरक्षण दलाची सज्जता आणि क्षमता वाढली आहे.