flotilla Greta Thunberg Pudhari Photo
आंतरराष्ट्रीय

flotilla Greta Thunberg : ग्रेटाचा इस्त्रायलची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न फसला; नौदलानं गाझाच्या मदतीसाठी आलेली ४५ जहाजे रोखली

पॅलेस्टाईनमधील युद्धग्रस्त लोकांना मदतीचा हात देण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाले होते. त्याअंतर्गत फ्लोटिला या ४५ मदतीची जहाजांचा कळप पॅलेस्टाईनकडं रवाना झाला होता.

Anirudha Sankpal

flotilla Greta Thunberg :

इस्त्रायल नौदलानं गाझातील लोकांच्या मदतीसाठी येणाऱ्या ४५ जहाजे रोखल्या आहेत. या नौकांना इस्त्रायलची सुरक्षा भेदता आलेली नाही. त्यामुळं गाझामधील लोकांपर्यंत मदत पोहचवण्याचा शेवटचा प्रयत्न देखील अयशस्वी झाला आहे. इस्त्रायलनं पॅलेस्टाईन भागात येणारी सर्व मदत रोखून धरली आहे.

पॅलेस्टाईनमधील युद्धग्रस्त लोकांना मदतीचा हात देण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाले होते. त्याअंतर्गत फ्लोटिला या ४५ मदतीची जहाजांचा कळप पॅलेस्टाईनकडं रवाना झाला होता. यात युरोपातील अनेक राजकारणी आणि स्विडनची पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग देखील होती. त्यांना गेल्या महिन्यात स्पेनपासून आपला प्रवास सुरू केला होता. त्यांनी इस्त्रायलची नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न यशस्वी ठरला.

फ्लोटिला आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हणातात की, 'आम्ही रात्री जवळपास ८.३० वाजता. अलमा, सुरीअस, अद्रा यांचा समावेश असलेल्या फ्लोटिलाची अनेक जहाजे अनधिकृतरित्या गाझाच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी इस्त्रायलच्या नौदलानं हा प्रयत्न हाणून पाडला.'

ते पुढे म्हणाले, 'ज्यावेळी इस्त्रायनलं ही जहाजं रोखली त्यानंतर या मदतीच्या जहाजावरील लाईव्ह स्ट्रीमिंग आणि संदेश दळणवळण सिस्टम देखील बंद करण्यात आली.

यानंतर इस्त्रायल परराष्ट्र मंत्र्यांनी ट्वीटवर एक पोस्ट केली. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, 'फ्लोटिलाच्या अंतर्गत गाझाकडे येणारी अनेक जहाजे आम्ही यशस्वीरित्या आणि सुरक्षितरित्या रोखली आहेत. त्यातील प्रवासी हे इस्त्रायली बंदरावर पाठवण्यात आली आहेत. ग्रेटा आणि तिचे मित्र सुरक्षित आहेत.

इस्त्रायलच्या नौदलाने या जहाजांना नाकेबंदी केलेल्या जलक्षेत्रात प्रवेश न करण्याची ताकीद दिली होती. ताफ्यात जहाजांना सोबत करणाऱ्या स्पेन आणि इटली या देशांनीही जहाजांना इस्त्रायलने घोषित केलेल्या बहिष्कार क्षेत्रात (exclusion zone) प्रवेश करण्यापूर्वी थांबण्याची विनंती केली होती. संयोजकांनी ट्युनिशियामध्ये दहा दिवसांच्या मुक्काम केला होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर दोन ड्रोन हल्ल्यांची माहिती दिली होती.

दरम्यान त्या ताफ्याने १५ सप्टेंबरला आपला प्रवास पुन्हा सुरू केला. या प्रवासात, ताफ्यातील मुख्य जहाजे, 'अल्मा' आणि त्यानंतर 'सिरियस', यांना एका इजरायली युद्धनौकेने आक्रमकपणे गोल फिरून त्रास दिल्याचा आरोप ताफ्यातील गटाने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT