

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील डेविस शहरात डेविस जॉईंट युनिफाईड स्कूल डिस्ट्रिक्टच्या बोर्ड मिटिंगमध्ये एक धक्कादायक घटना घडली. ‘मॉम्स फॉर लिबर्टी’ या संघटनेच्या अध्यक्ष बेथ बॉर्न यांनी ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांच्या हक्कांविरोधात निषेध व्यक्त करताना सर्वांसमोर अचानक स्वतःचे कपडे काढले आणि बिकिनीमध्ये भाषण द्यायला सुरुवात केली.
या प्रकाराने मिटिंगमध्ये गोंधळ उडाला आणि बोर्डला तत्काळ मिटिंग स्थगित करावी लागली. ही घटना त्यावेळी घडली, ज्यावेळी बाथरूम आणि लॉकर रूम वापरावर चर्चा सुरू होती. नवीन धोरणांनुसार, ट्रान्सजेंडर विद्यार्थी त्यांच्या लिंग ओळखीनुसार सुविधा वापरू शकतात. म्हणजे एखादा मुलगा जर स्वतःला मुलगी समजत असेल, तर तो मुलींसाठी असलेल्या लॉकर रूमचा वापर करू शकतो. बेथ बॉर्न या धोरणाला तीव्र विरोध करत असून, त्यांचा दावा आहे की, हे धोरण इतर विद्यार्थिनींसाठी असुरक्षित आणि अस्वस्थतेचे कारण ठरत आहे. दरम्यान, या व्हिडीओने संपूर्ण देशात ट्रान्सजेंडर हक्क, शाळेतील धोरणे आणि पालकांच्या भूमिकांवर नव्याने वाद निर्माण केला आहे.