Trump On Iran Protest pudhari photo
आंतरराष्ट्रीय

Trump On Iran Protest: अशा जागी मारणार जिथं... अमेरिकेनं इराणला दिली धमकी, ट्रम्प थेट लष्कर उतरवणार?

Donald Trump On Iran : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या परिस्थितीवर आमचं बारीक लक्ष असल्याचं सांगत मोठ्या कारवाईचा इशारा दिला आहे.

Anirudha Sankpal

Trump On Iran Protest: इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. सध्याच्या खामेनेई सत्तेविरूद्ध जनक्षोभ उसळला असून सरकार हे आंदोलन दाबण्यासाठी आंदलनकार्त्यांविरूद्ध हिंसाचाराचा अवलंब करत आहे. त्यामुळं आता अमेरिका इराणच्या या देशांतर्गत संघर्षात हस्तक्षेप करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका अशा ठिकाणी हल्ला करेल जिथं सर्वात जास्त वेदना होईल. असं सांगत लष्करी हस्तक्षेपाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा कडक इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बड्या तेल आणि गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. यानंतर माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण खूप अडचणीत आहे. मला वाटते की तेथील लोकं त्यांच्या शहरांवर कब्जा करत आहेत. या गोष्टीची कोणीही कल्पना केली नव्हती.

ट्रम्प पुढे म्हणाले की, आम्ही यापूर्वीच इराणच्या धर्मसत्तेला कडक शब्दात इशारा दिला आहे. जर ते त्यांच्या लोकांना मारायला सुरू करतील तर आम्ही त्यांना अशा जागी मारू जिथं त्यांना सर्वात जास्त वेदना होतील.

लष्कर उतरवण्याबाबत ट्रम्प म्हणाले...

ट्रम्प यांनी जरी आक्रमक भाषा केली असली तरी त्यांनी इराणमध्ये सैन्य कारवाई करत त्यांच्या भूमीवर लष्कर उतरवणार नाही असं सांगितलं आहे. ते म्हणाले, 'याचा अर्थ आम्ही सैन्य उतरवणार असा नाही. मात्र याचा अर्थ असा नक्की आहे की आम्ही जोरदार वार करू अन् अशा ठिकाणी वार करू जिथं वेदना भयंकर होतील. आम्हाला असं करायचं नाहीये.'

तर किंमत चुकवावी लागले

ट्रम्प यांनी इराणमधील घटनाक्रमांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी इराणमध्ये असं काही होत आहे याच्यावर विश्वासच बसत नाहीये. त्यांनी स्वतःच्या लोकांविरूद्ध अत्यंत वाईट व्यवहार केला आहे आणि आता ते त्याची किंमत चुकवत आहेत. बघू पुढं काय होतं. आम्ही याच्यावर वारीक नजर ठेवून आहोत.

ट्रम्प पुढे म्हणाले की, मी आशा करतो की इराणमध्ये आंदोलन करणारे सुरक्षित राहतील अशी आशा करतो. इराण या घडीला सर्वात खतरनाक जागा आहे. मी इराणी नेत्यांना पुन्हा सांगतो की गोळीबार सुरू करू नका. जर तुम्ही गोळी चालवली तर आम्ही देखील गोळी चालवणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT