Donald Trump Tariff Threat:
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपण भारत - पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. त्यांनी या दोन्ही देशांवर मी २५० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिल्याचा देखील दावा केला आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारत - पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी घडवण्यात आपला हात असल्याचा पुन्हा एकदा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भारतानं अनेकवेळा ऑपरेशन सिंदूर हे ज्यावेळी पाकिस्तानकडून हल्ले थांबवण्याची विनंती करण्यात आली त्याचवेळी शस्त्र संधी करण्यात आलाचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मी या दोन्ही देशांना धमकी देऊन संभाव्य युद्ध थांबवल्याचा दावा करणं काही सोडलेलं नाही. डोनाल्ड ट्रम्प सध्या दक्षिण कोरियात आहेत. तिथं त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांच्याशी देखील बोलणी केली. त्यांनी चीनवरील टॅरिफ कमी करण्यास सहमती दर्शवत वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्याबाबतचा आपला जुना दावा कायम ठेवला आहे. ते म्हणाले, 'तुम्ही जर भारत - पाकिस्तान याच्याबद्दल बोलायच म्हटलं तर ते युद्ध सुरू ठेवणार होते. सात लढाऊ विमानं पाडण्यात आली. ते युद्धासाठी सज्ज झाले होते. '
ट्रम्प पुढे म्हणाले, 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्याशी बोललो त्यांना मी टॅरिफ लादण्याबद्दल इशारा दिला. मी म्हणालो दोन्ही देशांवर मी २५० टक्के टॅरिफ लावणार याचा अर्थ तुम्ही व्यापारच करू शकणार नाही. ही आम्हाला तुमच्यासोबत व्यापार करायचा नाही हे सांगण्याची उत्तम पद्धत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी नेत्यांनी हे धुडकावून लावलं. ते दोघेही नाही नाही आम्हाला लढू द्या असं म्हणत होते. मात्र दोन दिवसांनी ते आम्ही समजलो आहोत आणि आम्ही युद्ध थांबवत आहोत असं सांगितल्याचा दावा केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगले दिसणारे व्यक्ती मात्र अत्यंत कठोर.' असं म्हणत स्तुती देखील केली होती. अमेरिकेनं भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला आहे. दरम्यान, ट्रेड डीलबाबत अमेरिका आणि भारत यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केली आहे.