

Donald Trump Nuclear Weapons:
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी चीनचे अध्यक्ष शी जिंगपिंग यांची दक्षिण कोरियात भेट घेतली. मात्र या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी असं काही केलं की संपूर्ण जगानं भूवया उंचावल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला त्वरित आपले न्यक्लिअर वेपनचे टेस्टिंग सुरू करण्याचे आदेश दिले. त्यांनी इतर न्यूक्लिअर देशांच्या तुलनेत असं करण्याचे आदेश दिले आहेत.
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट लिहिली की, 'इतर देश आपल्या अण्विक ताकदीची चाचपणी करत आहेत. मी देखील आमच्या युद्ध विभागाला आपल्याकडील आण्विक शस्त्रे तपासणीचा आदेश दिला आहे. ही प्रक्रिया त्वरित सुरू होणार आहे.' ट्रम्प यांनी हा आदेश दक्षिण कोरियात जिंगपिंग यांच्या भेटीपूर्वी दिला.
दरम्यान, बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियानं पोसायडन न्युक्लिअर पॉवर सुपर टॉर्पिडोचे यशस्वी परीक्षण केल्याची माहिती दिली होती. लष्करी जाणकारांच्या मते रशियाकडील या पोसायडन टॉर्पिडोकडे एखादा समुद्री तट उद्घ्वस्त करण्याची ताकद आहे.
पुतीन हे आपली न्युक्लिअर क्षमता जाहीररित्या दाखवत असल्याचं ट्रम्प यांच मत आहे. पुतिन यांनी २१ ऑक्टोबरला बरेवेस्त्निक क्रुज मिसाईलचं परीक्षण केलं होतं अन् २२ ऑक्टोबरला न्युक्लिअर लाँचचं ड्रील देखील केलं होतं.
अमेरिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी आपल्या अण्विक शस्त्रांचं १९९२ मध्ये शेवटचं टेस्टिंग केलं होतं. आता अमेरिकेनं न्युक्लिअर वेपनचं टेस्टिंग करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळं त्यांच्याकडे कोणतं नवं न्युक्लिअर शस्त्र आहे का आणि त्यांची जुनी न्युक्लिअर शस्त्रे अजूनही काम करतात का याची माहिती मिळेल.
मात्र अमेरिकेच्या या निर्णयामुळं चीन आणि रशिया याकडं अमेरिकेचं मुद्दाम उकसवण्यचं धोरण असं पाहील. ट्रॅम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये जगात सर्वात जास्त न्युक्लिअर वेपन हे अमेरिकेकडे आहेत. त्यानंतर रशिया आणि तिसऱ्या क्रमांकावर चीन असल्याचं सांगितलं. होतं. मात्र येत्या ५ वर्षात हे सर्वजण बरोबरीत येतील असही ट्रम्प यांचं म्हणणं आहे.
अमेरिकेनं जुलै १९४५ मध्ये पहिल्यांदा न्युक्लिअर वेपन टेस्ट करून या स्पर्धेला सुरूवात केली होती. त्यानंतर जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर ऑगस्ट १९४५ मध्ये अणुबॉम्ब टाकून दुसरे महायुद्ध संपवले होते.