Donald Trump Nobel: डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पारितोषिक मिळावं यासाठी इच्छा व्यक्त केली होती. ती इच्छा काही लपून राहिली नव्हती. मात्र यंदाचा नोबेल पुरस्कार हा व्हेनेजुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी मिळाला होता. त्यांनी देखील आपला पुरस्कार हा डोनाल्ड ट्रम्प अन् अमेरिकेला समर्पित केला होता.
दरम्यान, नुकतेच व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि नोबेल पारितोषिक विजेत्या मचाडो यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आपले नोबेल शांती पुरस्कार पदक भेट दिलं. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी याचा स्विकार केला आहे की नाही हे समजू शकलेलं नाही. मचाडो या गुरूवारी व्हाईट हाऊसमध्ये पोहचल्या होत्या.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प आणि मचाडो यांच्या भेटीमुळे व्हेनेजुएलामधील राजकीय भविष्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली होती.
त्यानंतर गुरूवारी ट्रम्प आणि मचाडो यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. त्या ज्यावेळी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्या त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केलं. समर्थकांनी सांगितलं की, 'आमचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विश्वास आहे.' त्यानंतर ट्रम्प यांच्या नावाचा जयघोष केला. मचाडो व्हाईट हाऊसनंतर वॉशिंग्टनमध्ये इतर कार्यक्रमासाठी रवाना झाल्या.
त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पारितोषिक स्विकारलं का असा प्रश्न मचाडो यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. अनेक आठवड्यापासून ट्रम्पला त्या नोबेल पारितोषिक देण्याची शक्यात वर्तवली जात होती. याबाबत त्यांनी मागेही काही वक्तवे केली होती.
नोबेल शांती पुरस्कार देणाऱ्या संस्थेने यापूर्वीच स्पष्टे केलं आहे की नियमानुसार हा नोबेल पुरस्कार कोणालाही हस्तांतरित करता येत नाही.