donald trump election promise iron dome like israel us presidential election 2024
'मी जिंकलो तर इस्रायलप्रमाणे अमेरिकेत आयर्न डोम बसवून देईन...', ट्रम्प यांचे निवडणूक वचन File Photo
आंतरराष्ट्रीय

'मी जिंकलो तर इस्रायलप्रमाणे अमेरिकेत आयर्न डोम बसवून देईन...', ट्रम्प यांचे निवडणूक वचन

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन :

डोनाल्‍ड ट्रंम्‍प यांनी मिल्‍वॉकी कन्वेंशन मध्ये सांगितले की, आम्‍ही आपल्‍या देशासाठी आयर्न डोम तयार करू. एक असा आयर्न डोम जो याआधी कोणीही पाहिला नसेल. या अत्‍याधुनिक मिसाईल डिफेंस सिस्‍टमला पूर्णतहा देशातच बनवले जाईल असे ते म्‍हणाले.

अमेरिकेचे माजी राष्‍ट्रपती आणि रिपल्‍बिकन पक्षाचे राष्‍ट्रपती पदाचे उमेदवार डोनाल्‍ड ट्रंम्‍प यांनी मिल्‍वॉकी मध्ये रिपब्‍लिकन पक्षाच्या कन्वेंशन मध्ये एका मोठे विधान केले. त्‍यांनी म्‍हंटलंय की, निवडणूक जिंकल्‍यानंतर त्‍यांचे सरकार देशाच्या सुरक्षेसाठी आयर्न डोम (Iron Dome) विकसित करणार आहे.

ट्रंम्‍प यांनी मिल्‍वॉकी मध्ये रिपब्‍लिक नॅशनल कन्वेंशन मध्ये संबोधित करताना सांगितले की, इस्‍त्रायलकडे आयर्न डोम आहे. त्‍यांच्याकडे मजबूत मिसाईल डिफेंन्स सिस्‍टम आहे. इस्‍त्रायलवर ३४२ क्षेपणास्‍त्रे डागण्यात आली होती. मात्र यातील फक्‍त एकच क्षेपणास्‍त्र थोड्या जवळपास लक्ष्यावर लागले होते. दुसऱ्या देशांकडे अशी यंत्रणा का असू नये आणि आमच्याकडे अशी प्रणाली का नाही असा प्रश्न त्‍यांनी उपस्‍थित केला? आम्‍ही आपल्‍या देशासाठी अशा प्रकारचा आयर्न डोम बनवू. आमच्या देशाकडे कोणीही नजर उठवून पाहू नये आणि आमच्या लोकांना कोणतेही नुकसान पोहचू नये यासाठी आम्‍ही प्रयत्‍न करू.

ते म्‍हणाले, आम्‍ही अशा प्रकारचा आयर्न डोम बनवू, ज्‍याला या आधी कोणीही पाहिले नसेल. या अत्‍याधुनिक क्षेपणास्‍त्र विरोधी यंत्रणेला पूर्णपणे देशातच तयार केले जाईल.

रिपब्‍लिकन पक्षाचे सुरक्षा धोरण काय आहे?

अमेरिकेतल्‍या सर्वात मोठ्या पक्षांमधील एक असलेल्‍या रिपब्‍लिकन पक्षाने आपले सुरक्षा धोरण याआधीच तयार केले आहे. त्‍या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षेसाठी इस्‍त्रायलच्या धर्तीवर आयर्न डोम यंत्रणा म्‍हणजेच क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तयार करणार असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. रिपब्‍लिकन पक्षाने याआधी म्‍हटले होते की, तिसऱ्या महायुद्धाला रोखण्यासाठी, युरोप आणि मध्ये पूर्वेत शांतता प्रस्‍थापित करण्यासाठी अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्‍टीने क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तयार करायची आमची तयारी आहे.

काय आहे आयर्न डोम?

इस्‍त्रायलने २०११ मध्ये आयर्न डोमला आपल्‍या देशात तैनात केले. हे इस्‍त्रायलची सर्वात शक्‍तिशाली यंत्रणा आहे. ही हवाई सुरक्षा यंत्रणा इस्‍त्रायलच्या लोकांना हवाई हल्‍ल्‍यांपासून वाचवते. जर आयर्न डोमला आपल्‍याकडे १०० क्षेपणास्‍त्रे येताना दिसली तर त्‍यातील ९० क्षेपणास्‍त्रांना ते हवेतच नष्‍ट करते.

Iron Dome कसे काम करते?

शत्रूकडून जसे क्षेपणास्‍त्र डागले जाते, तसे आयर्न डोमवर लावलेल्‍या यंत्रणेला त्‍याची माहिती होते. ते त्‍याला ट्रॅक करते. यानंतर कंट्रोल सिंस्‍टम इंम्‍पॅक्‍ट पॉइंटची माहिती करून घेते. म्‍हणजेच जर क्षेपणास्‍त्र कोसळले तर किती नुकसान होणार याचा ते अंदाज घेते. त्‍याला हवेतच मारून पाडले तर किती अंतरावर ते फुटेल. कारण यामुळे आपले कोणतेही नुकसान होता कामा नये. यानंतर कंट्रोल सिस्‍टमने दिलेल्‍या कमांडवर लॉन्चर मधून क्षेपणास्‍त्र डागले जाते. ज्‍याला इंटरसेप्टर म्‍हटले जाते. इस्‍त्रायलचे लोक त्‍याला तामीर म्‍हणतात. हे क्षेपणास्‍त्र शत्रू क्षेपणास्‍त्राजवळ जात फुटते, यामुळे समोरील क्षेपणास्‍त्रही नष्‍ट होते.

SCROLL FOR NEXT