अर्जेंटिनाने रचला इतिहास, १६व्यांदा कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

अंतिम फेरीत कोलंबियाचा पराभव
Copa America 2024
अर्जेंटिनाने १६व्यांदा कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेfile photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : Copa America 2024 Final : अर्जेंटिनाने विक्रमी १६व्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. कोपा अमेरिकेचा अंतिम सामना कोलंबिया आणि अर्जेंटिना यांच्यात मियामीच्या हार्ड रॉक स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये अर्जेंटिनाने कोलंबियाचा १-० असा पराभव केला.

निर्धारित वेळेत स्कोअर ०-० असा राहिला. त्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. पहिल्या अतिरिक्त हाफमध्येही दोन्ही संघांना गोल करता आला नाही. पण ११२ व्या मिनिटाला लॉटारो मार्टिनेझने अर्जेंटिनासाठी गोल केला. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली आणि मेस्सीचा संघ १-० असा विजय मिळवत चॅम्पियन ठरला. अर्जेंटिनाचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी २०२१ मध्ये ब्राझीलला पराभूत केले होते. कोलंबिया २३ वर्षांपूर्वी २००१ मध्ये शेवटचा अंतिम सामना खेळला होता आणि त्यांच्या यजमान पदार्पणात चॅम्पियन बनला होता.

मेस्सीला पुन्हा दुखापत

उत्तरार्धात, सामन्याच्या ६४ व्या मिनिटाला मेस्सी पुन्हा एकदा जखमी झाला. त्याला बाहेर जावे लागले. त्याच्या जागी निकोलस गोन्झालेझला यावे लागले. मेस्सी मैदान सोडेपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. बाहेर गेल्यानंतर मेस्सी खूप निराश झाला आणि तो रडताना दिसला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news