Netanyahu Israel Election pudhari
आंतरराष्ट्रीय

Netanyahu Israel Election: नेतन्याहू 'हरलेली' निवडणूक माझ्यामुळे जिंकले... डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा मोठा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली.

Anirudha Sankpal

Netanyahu Israel Election: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवडणुकीतील यशाचे श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न केला आहे. इस्त्रायलमध्ये मंगळवारी संसदीय निवडणुकीचे सुरूवातीचे निकाल आले असून त्यात नेतन्याहूंच्या नेतृत्वाखालील युतीने आघाडी घेतली आहे. बुधवारी सकाळी ५५.४ टक्के मतांची मोजणी झाली होती. त्यात नेतन्याहू यांच्या नेतृत्वातील युतीला ५६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात होता. तर विरोधी आघाडी ही ४९ जागांवर पुढे होती. अरब पक्षांना १५ जागा मिळण्याची शक्यात होती. सुरूवातीच्या आकड्यावरून कोणालाही स्पष्ट बहूमत मिळालेलं नाही.

काय म्हणाले ट्रम्प?

त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली. त्यात दावा करण्यात आला की नेतन्याहूच्या समर्थनात आपण मैदानात उतरल्यानंतर निवडणुकीचं चित्र पालटलं.

डोनाल्ड ट्रम्प आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, 'नेतन्याहू यांच्या समर्थनात ज्यावेळी मी उतरलो त्यावेळी निवडणुकीचा माहोल बतलला. ट्रम्प यांच्या पोस्टनुसार नेतन्याहू यांना या निवडणुकीत पराभव सहन करावा लागला असता. आता स्पर्धा ही बरोबरती आली आहे. किंवा त्यांचा विजय होण्याची शक्यता आहे.

बहुमताच्या आकड्यापासून दूरच

१८ ऑक्टोबर रोजी डोनाल्ड ट्रम्प हे नेतन्याहू यांच्या समर्थनात आले होते. त्यानंतर ९ दिवसांनी त्यांनी माझ्यामुळे नेतन्याहू हे निवडून आले असं सांगणारी पोस्ट केली आहे. इराणविरूद्धच्या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायल हे पार्टनर असून त्यांनी अनेक संयुक्त मोहिमा केल्या आहेत. या मोहिमा पुढे नेण्यासाठी नेतन्याहू पुन्हा जिंकणे गरजेचे असल्याचे ट्रम्प म्हणाले होते.

इस्त्रायलच्या संसदेला नेसेट म्हणतात. यात एकूण १२० जागा असून बहुमतासाठी कोणत्याही आघाडीला किमान ६१ जागांची गरज असते. बुधवारी सकाळी ५५.४ टक्के मतांची मोजणी झाली त्यावेळी नेतन्याहू यांच्या समर्थनातील आघाडीला ५६ जागा मिळतील असा अंदाज होता. विरोधी आघाडीला ४९ जागा तर १५ जागा या अरब पक्षांना मिळण्याचा अंदाज होता.

सर्वेक्षणात नेतन्याहू होते पिछाडीवर

याचा अर्थ सुरूवातीच्या आघाडीनंतरही नेतन्याहू हे बहुमतापासून ५ जागा पाठीमागे होती. दुसरीकडे विरोधी आघाडी देखील आपल्या एकटच्या जिवावर सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत दिसत नाहीये.

सुरूवातीच्या सर्वेक्षणात नेतन्याहूंची आघाडी ६१ चा बहुमताचा आकडा टच करण्यापासून लांब राहणार असा अंदाज वर्तवला होता. त्या तुलनेत सुरूवातीचे आलेले निकाल हे नेतन्याहूंसाठी अपेक्षेपेक्षा चांगेल आहेत. मात्र यावरून ट्रम्प यांच्यामुळे नेतन्याहूंना फायदा झाला असं सिद्ध होत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT