आंतरराष्ट्रीय

Cyclone Remal| ‘रेमल’चे बांगला देशमध्ये थैमान | १० ठार, ३० हजार घरे उद्‍ध्‍वस्‍त

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या रेमल चक्रीवादळाने बांगला देशमध्ये हाहाकार उडवला आहे. रविवारी (दि.२७) मध्यरात्री (Cyclone Remal) हे वादळ पश्चिम बंगाल आणि बांगला देशच्या किनारपट्टीवर धडकण्यास सुरूवात केली. पश्चिम बंगालमध्ये २ जण तर बांगलादेशात १० जण ठार झालेत. या संदर्भातील वृत्त'Ndtv'ने दिले आहे.

रेमल चक्रीवादळामुळे बांगलादेशात सखल भागात चक्रीवादळ धडकले. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत १० लोकांचा मृत्यू झाला आहे. यामधील बहुतांश लोक भिंती काेसळून झालेल्‍या दुर्घटनांमध्‍ये मृत्‍युमुखी पडले आहेत. यामध्ये सात लोकांचा समावेश आहे. तर इतर तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. चक्रीवादळात 30,000 हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. हजारांपेक्षा अधिक लोकांचे मोठे नुकसान (Cyclone Remal) झाले आहे, असे उच्च स्थानिक अधिकाऱ्यांनी आज (दि.२७) सांगितले.

ताशी १३५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह तीव्र चक्रीवादळ 'रेमल' बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रविवारी रात्री धडकले. या चक्रीवादळाच्या तडाख्याने बंगालमध्ये हाहाकार उडाला आहे. यामुळे मुसळधार पाऊस पडत असून अनेक भागात मोठ्या प्रमाणात पडझड (Cyclone Remal) झाली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT