बिजिंग; वृत्तसंस्था : भारतीय सीमेजवळ चीनचा एक नवीन हवाई संरक्षण तळ आकार घेत असल्याचे उपग्रहीय प्रतिमांद्वारे उघड झाले आहे. ज्यात कमांड अँड कंट्रोल इमारती, बॅरक्स, वाहन शेड, दारूगोळा साठवण आणि रडारची ठिकाणे आहेत. या तळाचे सर्वात वेधक वैशिष्ट्य म्हणजे आच्छादित क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळे, जी क्षेपणास्त्र वाहून नेणार्या, उभारणार्या आणि डागणार्या ट्रान्सपोर्टर इरेक्टर लाँचर वाहनांसाठी उघडझाप करता येणार्या छपरांनी सज्ज असल्याचे मानले जाते.
तिबेटमधील पांगोंग तलावाच्या पूर्व किनार्यावर 2020 च्या सीमा संघर्षातील एका संघर्ष बिंदूपासून सुमारे 110 कि.मी. अंतरावर बांधकाम वेगाने सुरू आहे. सॅटेलाईट फोटोंमध्ये चीनचा एक नवीन हवाई संरक्षण तळ आकार घेत असल्याचे दिसत आहे. ज्यात कमांड अँड कंट्रोल इमारती, बॅरक्स, वाहन शेड, दारूगोळा साठवण आणि रडारची ठिकाणे आहेत.
जी क्षेपणास्त्र वाहून नेण्यास, उभे करण्यास आणि डागण्यास सक्षम असलेल्या ट्रान्सपोर्टर इरेक्टर लाँचर वाहनांसाठी उघडझाप करता येणार्या छपरांनी सज्ज असल्याचे मानले जाते. गुप्तचर विश्लेषकांच्या मते, ही मजबूत आश्रयस्थाने चीनच्या लांब पल्ल्याच्या - 9 सरफेस-टू-एअर मिसाइल प्रणालीसाठी गुप्तता आणि संरक्षण देऊ शकतात.
भारत-तिबेट सीमेवर अशी संरक्षित प्रक्षेपण स्थळे ही एक नवीन घडामोड असली, तरी यापूर्वी दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त बेटांवरील चिनी लष्करी चौक्यांवर अशाच प्रकारच्या सुविधा आढळून आल्या आहेत. पांगोंग तलावाजवळील दुसर्या तळाच्या बांधकामाचा सुरुवातीचा टप्पा जुलैच्या अखेरीस भू-अवकाशीय संशोधक डेमियन सायमन यांनी प्रथम ओळखला होता. तथापि, त्यावेळी या आच्छादित क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांचे स्वरूप ज्ञात नव्हते.