Canva Lays Off pudhari
आंतरराष्ट्रीय

Canva Lays Off: कॅनव्हा मधील हजारो कर्मचाऱ्यांवर नोकरकपातीची कुऱ्हाड; वाढीचा दर कमी झाल्याने घेतला मोठा निर्णय

दशकात पहिल्यांदाच कॅनव्हाचा वाढीचा दर मंदावला आहे. त्यानंतर कंपनीने मोठा निर्णय घेतला.

Anirudha Sankpal

Canva Lays Off: कॅनव्हाचे सह संस्थापक आणि मुख्य एक्झिक्युटिव्ह मेलानी पार्किन्स यांनी आपल्या स्टाफला सांगितला की आपल्याला कॅनव्हाला नव्यानं शोधायचं असून संस्था आता छोट्या आणि अधिक शक्तीशाली टीमकडे पुन्हा वळणार आहे. दशकात पहिल्यांदाच कॅनव्हाचा वाढीचा दर मंदावला आहे. त्यानंतर आपली वर्कफोर्स कमी करण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

22 टक्के कर्मचारी कपात?

या धक्कादायक निर्णयामुळे कॅनव्हामध्ये काम करणाऱ्या जळपास १२७१ जणांवर परिणाम होणार आहे. ही कॅनव्हाच्या एकूण वर्कफोर्सपैकी २२ टक्के वर्कफोर्स आहे. काही स्टाफचे रोल बदलण्यात येणार आहेत तर काहींना रिलोकेट करण्यात येणार आहे. याबाबतच्या पत्रात पार्किन्स लिहितात की, 'आपल्या १३ वर्षाच्या काळात हा सर्वात अवघड क्षण आहे. आम्ही याबाबतच्या अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर आम्ही या कठिण निर्णयापर्यंत आलो आहोत. छोटे बदल करून काही होणार नाही या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहचलो आहोत.'

पुढच्या दशकासाठी तयार रहायला हवं

त्या पुढे लिहितात, 'जर आपल्याला पुढच्या दशकासाठी तयार रहायचं असेल तर आपल्याला कॅनव्हाला पुन्हा शोधलं पाहिजे. आपल्याला पुन्हा मुळापर्यंत जाऊन छोटे, शक्तीशाली टीम मिळवायला हवी जी मुक्तपणे आपले निर्णय घेत होती, जबाबदारी घेईल आणि आपल्या कम्युनिटीसाठी का जास्त गरजेचं आहे त्यावर जास्त लक्ष केंद्रित करेल अशी टीम मिळवायची आहे.

वर्क फ्रॉम होमही कमी होणार

कॅनव्हा त्यांचे प्रोडक्ट, वाढ आणि प्लॅटफॉर्म टीमचे एकत्रिकरण करून एक सिंगल प्रोडक्शन संस्थेत रूपांतरित करणार आहोत. आपण आता व्यवस्थापनाचे स्तर कमी करणार आहोत. आता सिडनी हे अनेक प्रोडक्ट टीम्सचे मुख्य स्थान असणार आहे. जे हायब्रीड काम करतात त्यांना जानेवारी महिन्यापासून आठवड्यातून २ ते ३ दिवस ऑफिसला येऊन काम करावं लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT