आंतरराष्ट्रीय

Cambodia Job Scam : कंबोडियात नाेकरीच्‍या अमिषाला बळी पडलेले ६० भारतीय मायदेशी परतले

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : कंबोडियात नाेकरी मिळेल, या आमिषाला बळी पडलेले ६० भारतीय मायदेशी परतले आहेत. या सर्वांची सोमवारी (दि.२०) जिनबेई-४ ठिकाणावरुन  सुटका झाली हाेती. दरम्‍यान, भारतीय दूतावासाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सिहानोकविले येथे २१ ते २३ मे असे तीन दिवस नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. भारतीय नागरिकांना अडचणी येत असतील तर त्यांनी घरी परतण्यासाठी दूतावासाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.

माहितीनुसार भारतीय दुतावासाने गुरुवारी (दि.२०) सांगितले की, "कंबोडियात नाेकरीच्‍या आमिषाने अडकलेल्‍या ६० भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. ते मायदेशी परतले आहेत. Cambodia Job Scam ) अलिकडेच भारतीय दुतावासाने कंबोडियात नोकरी करणाऱ्यांसाठी सल्ला दिला आहे की, "भारतीय नागरिकांनी परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) मंजुर केलेल्या अधिकृत एजंटमार्फत रोजगार सुरक्षित करुन जावे". भारतीय दुतावासाने 'X' अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "परदेशात भारतीयांना मदत करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. कंबोडियातील भारतीय दूतावासाने फसव्या नियोक्त्यांपासून सुटका केलेल्या ६० भारतीय नागरिकांची पहिली तुकडी मायदेशी परतली आहे. कंबोडियन अधिकाऱ्यांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार."

कंबाेडियात तीन दिवसांसाठी तात्पुरता नियंत्रण कक्ष

भारतीय दूतावास कंबोडियामध्ये नोकरी शोधत असलेल्या भारतीयांना अनाधिकृत एजंटांना बळी पडू नये म्हणून सावध करण्यासाठी  सूचना जारी करत आहे. भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्यात सांगण्यात आले असुन, यजमान सरकारने ज्या उद्देशासाठी व्हिसा मंजूर केला आहे, जसे की "पर्यटक व्हिसा", या पर्यटक व्हिसाचा वापर रोजगार मिळवणे या सारख्या बाबींमध्ये अडकू नका. सिहानोकविले येथे २१ ते २३ मे असे तीन दिवस नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. भारतीय नागरिकांना अडचणी येत असतील तर त्यांनी घरी परतण्यासाठी दूतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहनही भारतीय दुतावासाने केले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT