Bitcoin  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Bitcoin hits record high | बिटकॉईनचा विक्रमी उच्चांक! पोहचला 112,000 डॉलरच्या उंबरठ्यावर, एमिरेट्सची क्रिप्टोमध्ये एन्ट्री...

Bitcoin hits record high | 3 महिन्यांत 39 टक्क्यांची वाढ; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह, बिटकॉईन, एथरियमसह सर्वच टोकन्स तेजीत

पुढारी वृत्तसेवा

Bitcoin hits record high

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिटकॉइनने गुरुवारी (10 जुलै) इतिहास रचला असून, तो पहिल्यांदाच $111,925.38 च्या पातळीवर पोहोचला आहे. गेल्या 3 महिन्यांत या सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीमध्ये 39.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर मागील एका वर्षात ही वाढ तब्बल 95.2 टक्क्यांची नोंदली गेली आहे.

गुंतवणूकदारांचा वाढता कल 

Mudrex चे सहसंस्थापक आणि CEO एडुल पटेल यांनी सांगितले की, “फेडरल रिझर्व्हच्या जून महिन्याच्या FOMC मिनिट्समध्ये बहुतेक धोरणकर्त्यांनी 2025 मध्ये किमान एक वेळा व्याजदर कपात करण्याचे संकेत दिले.

यामुळे गुंतवणूकदारांमध्ये 'रिस्क-ऑन' भावना निर्माण झाली. त्याचवेळी, अमेरिकेच्या वाढत्या कर्जामुळे डॉलर इंडेक्स 21 वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला असून, बिटकॉइनसाठी हा अनुकूल कालखंड ठरत आहे.”

प्रमुख क्रिप्टोकरन्सीचे भाव

क्रिप्टोकरन्सी सध्याचा दर (सकाळी 10.02 पर्यंत)

  • बिटकॉईन (BTC) $111,020.59

  • एथरियम (ETH) $2,771.37

  • BNB $671.45

  • XRP $2.42

  • सोलाना (SOL) $157.22

मार्केटची स्थिती

  • बिटकॉईनची मार्केट कॅप: $2.2 ट्रिलियन

  • 24 तासांची ट्रेडिंग व्हॉल्युम: $59.58 अब्ज

  • सर्क्युलेटिंग सप्लाय: 19.89 दशलक्ष BTC

  • 24 तासांतील वाढ: 2.43 टक्के

क्रिप्टोला साथ मिळणारी इतर कारणे

Emirates Airlines आणि Crypto.com यांच्यात भागीदारी झाली आहे. भविष्यात प्रवासी बिटकॉईनच्या माध्यमातून तिकीट खरेदी करू शकतील.

BNY Mellon ही परंपरागत फायनान्स कंपनी Ripple च्या स्थिर नाण्यांची मुख्य कस्टोडियन बनली आहे.

क्रिप्टो ETF मध्ये $507.5 दशलक्षची गुंतवणूक झाली असून, हे गुंतवणूकदारांचा वाढता आत्मविश्वास दर्शवते.

मार्केटमधील इतर घडामोडी

  • GMX एक्सचेंजवर 40 दशलक्ष डॉलरचा हॅक झाला आणि हॅकरला ते परत देण्यासाठी 10 टक्के बक्षिसाची घोषणा करण्यात आली.

  • Ripple च्या स्थिर नाण्याचे सर्क्युलेशन 500 दशलक्ष डॉलरच्या पुढे गेले आहे.

  • दिवसभरात 500 दशलक्ष डॉलरचे क्रिप्टो लिक्विडेशन झाले, ज्यात 436 दशलक्ष डॉलर्स शॉर्ट्स होते.

  • Dogwifhat, SPX6900 यांसारख्या काही टोकन्समध्ये 12 टक्के वाढ झाली, तर Bonk, DeXe यामध्ये किंचित घट झाली आहे.

बिटकॉईन म्हणजे काय?

बिटकॉईन (Bitcoin) ही एक डिजिटल चलन आहे, जी क्रिप्टोकरन्सी प्रकारात मोडते. ही कोणत्याही देशाच्या सरकारने किंवा बँकेने जारी केलेली नसते. बिटकॉईनवर कोणत्याही मध्यवर्ती बँकेचा किंवा सरकारचा कंट्रोल नसतो.

नेटवर्कमधील सर्व युजर्स एकमेकांशी थेट व्यवहार करतात. बिटकॉइन व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी ब्लॉकचेनचा वापर केला जातो. ब्लॉकचेन म्हणजे व्यवहारांची एक डिजिटल साखळी असते.

फक्त 21 दशलक्ष (21 million) बिटकॉईनच तयार होऊ शकतात. त्यामुळे याला सोन्याप्रमाणे ‘डिजिटल गोल्ड’ देखील म्हटलं जातं. या व्यवहारांमध्ये युजरची ओळख पूर्णपणे उघड होत नाही. पण सर्व व्यवहार सार्वजनिक ब्लॉकचेनवर दिसतात – म्हणजे पारदर्शक असतात.

बिटकॉइन कशासाठी वापरतात?

  • ऑनलाइन खरेदीसाठी (काही वेबसाइट्सवर)

  • गुंतवणुकीसाठी (जसं सोनं किंवा शेअर्स)

  • पैसे परदेशात पाठवण्यासाठी (जलद व स्वस्त मार्ग)

धोके आणि मर्यादा:

  • बिटकॉईनचे मुल्य अतिशय चंचल असते (कधी खूप वाढते, कधी खूप कमी)

  • कायदेशीर अडचणी (सर्व देशांमध्ये वापर मान्य नाही)

  • सायबर सुरक्षेचा धोका (हॅकिंग वगैरे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT