Bangladesh India Relation: भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध आता सुरळीत होत आहेत. त्यातच आता दोन्ही देशांच्या नात्याच पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांगलादेशमधील विरोधी पक्ष नॅशनल सिटिजन पार्टीच्या वक्तव्यामुळं वादंग निर्माण झाला आहे. त्यांनी भारताकडून माफीनामा घ्या अशी मागणी केली आहे. याचबरोबर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्याबाबत देखील वक्तव्य करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला भारतानं याला कोणतेही उत्तर दिलेले नाही.
डेली स्टार रिपोर्टनुसार, 'एनसीपी खासदार विरोधी पक्षाचे चीफ व्हिप नाहिद इस्लाम यांनी सांगितलं की, अवामी लीगचे १६ वर्षे समर्थन करण्यासाठी भारताकडून माफीनामा घेतला पाहिजे. बजेट सेशनमध्ये चर्चा करणाता त्यांनी भारताने अजूनही बांग्लादेशच्या सध्याच्या राजनैतिक इतिहासात आपली भूमिकेचा स्विकार केलेला नाही. बांगलादेशचे शेजारील देशांशी बरोबरीचे आणि सन्मानपूर्वक नाते असले पाहिजे.
नाहिद यांनी सांगितलं की, 'नवे भारतीय उच्चायुक्तांच्या माफीने सुरूवात झाली पाहिजे. १६ वर्षे भारत सरकारने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अवामी लीगला सत्तेत राहण्यासाठी मदत केली होती. त्यासाठी त्यांनी बांगलादेशची माफी मागितली पाहिजे. भारताने उस्मान हादीच्या खुन्यांना आसरा दिल्याबद्दल माफी मागितली पाहिजे.
नाहिद यांनी बीएसएफवर बांग्लादेशांची हत्या केल्याचा आरोप केला. त्यांनी बीएनपी सरकार सत्तेत आळ्यापूसन जवळापस १० बांग्लादेशींना भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारलं आहे. बीएनपी मध्ये एक शब्द हा राष्ट्रवादी देखील आहे. आम्हाला पाहायचं आहे की ते सीमेपलीकडून होणाऱ्या हत्या कशा रोखणार आहेत.
ढाका ट्रिब्युननुसार नाहिद यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यावर देखील बेजबाबदार वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी बांग्लादेश सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने सुवेंदू अधिकाऱ्यांच्या वक्तव्यांचा कडक शब्दात प्रत्युत्तर द्यायला पाहिजे अशी देखील मागणी केली.