Bangkok Bar Fire: बँकॉकच्या चातुकाक जिल्ह्यातील प्रसिद्ध बारला आग लागली. या आगीत जवळपास २७ लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे तरी ८ जण गंभीर जखमी आहेत. याबाबतची माहिती थायलंडच्या पंतप्रधानांनी दिली आहे. सोमवारी मध्यरात्री बारला आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की ज्वाळा पुढच्या दारातून बाहेर येत होत्या.
प्रथमदर्शींनी सांगितलं की बारमधील स्टेजवर आग लागली आणि त्यानंतर ती वेगाने इतरत्र पसरली. यामुळं वीज गेली अन् रूममध्ये सर्वत्र धूर झाला. याबाबतचा व्हिडिओ एक्सवर व्हायरल होत आहे. यात आगीच्या ज्वाळा बारमधून बाहेर येताना दिसत आहेत. लोकं सैरा-वैरा धावत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. लोकं ओरडत होते अन् खाली पडत होते.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की आग कशामुळं लागली याची चौकशी अजून सुरू आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी मध्यरात्री पोहचले होते. एक ड्रायव्हरने मध्यरात्री बारला आग लागल्याचं पाहिलं. त्यानं वृत्तसंस्था डेली न्यूजला सांगितलं की त्याने गाडी थांबवून काच तोडली अन् दोन लोकांना बाहेर येण्यास मदत केली.
पंतप्रधान अनुतीन यांनी सांगितलं की त्यांनी म्युजिशयनशी बोलले आहेत. त्यांनी सांगितलं की, 'कट आऊट स्विचमधून आग लागली. त्यानंतर आग वेगानं परसरली, स्फोटही झाला अन् त्यानंतर सर्वजण बाहेर जाण्यासाठी गडबड करत होते. आग आणि धुरापासून वाचण्यासाठी सर्वजण गडबड करत होते.
अनेकांना बाहेर जाणे शक्य झाले नाहीत ते बिल्डिंगच्या मागच्या बाजूला स्वतःला वाचवण्याचा आणि धुर आगीपासून संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. ते बाथरूममध्येही लपले. मात्र सर्वाधिक मृतदेह हे तिथंच सापडले आहेत.'
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी दीड तासात आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तरी देखील या आगीत ९ पुरूष आणि १८ महिला मृत्यूमुखी पडल्या. ६० पेक्षा जास्त लोकांवर रूग्णालयात उपचला सुरू आहेत. त्यातील आठ लोक गंभीर आहेत. सुरूवातीच्या तपासात बहुतांश लोकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. असं असलं तरी संपूर्ण तपासानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.