sukhi chahal  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Sukhi Chahal death | खलिस्तानविरोधी लढ्यातील कार्यकर्ते सुखी चहल यांचे अमेरिकेत ‘गूढ’ निधन; अनिवासी भारतीयांमध्ये खळबळ

Sukhi Chahal death | तब्येत ठणठणीत असतानाही रात्रीच्या जेवणानंतर प्रकृती खालावली, खलिस्तानी गटांकडून मिळाल्या होत्या धमक्या

पुढारी वृत्तसेवा

Sukhi Chahal death in america

कॅलिफोर्निया : खलिस्तानी फुटीरतावादाचा तीव्र विरोध करणारे, अमेरिका स्थित उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुखी चहल यांचे अचानक आणि ‘गूढ’ मृत्यूने भारतप्रेमी आणि अतिरेकविरोधी समुदायात प्रचंड खळबळ उडवली आहे. 17 ऑगस्ट रोजी वॉशिंग्टन डी. सी. येथे होणाऱ्या खलिस्तान जनमतसंग्रह कार्यक्रमाच्या आधी त्यांच्या मृत्यूची वेळही संशयास्पद मानली जात आहे.

रात्रीच्या जेवणानंतर प्रकृती खालावली

चहल यांचे निकटवर्तीय जसपाल सिंग यांनी सांगितले की, चहल यांनी गुरुवारी एका परिचिताच्या घरी जेवण केले होते. जेवणानंतर लगेचच त्यांची तब्येत ढासळली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांची तब्येत याआधी पूर्णपणे ठणठणीत होती, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.

खलिस्तानी गटांकडून मिळत होते धमकीचे संदेश

सुखी चहल हे The Khalsa Today या माध्यमाचे संस्थापक आणि सीईओ होते. त्यांनी अनेकदा परदेशात सक्रिय असलेल्या खलिस्तानी गटांचा निषेध केला होता. त्यांच्या सहकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, त्यांना खलिस्तानी समर्थकांकडून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. मात्र, अशा धमक्यांमुळे त्यांनी कधीही आपले कार्य थांबवले नाही.

मृत्यूच्या वेळेने संशय वाढवला

17 ऑगस्टला वॉशिंग्टन डी.सी. येथे होणाऱ्या खलिस्तान जनमतसंग्रह कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर चहल यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिकच संशय व्यक्त केला आहे. त्यांनी या कार्यक्रमाला जोरदार विरोध केला होता.

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

सध्या स्थानिक पोलीस प्रकरणाचा तपास करत असून, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

परदेशातील भारतीय समाजावर शोककळा

चहल यांच्या निधनानंतर संपूर्ण भारतप्रेमी समाजात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी कायम परदेशात राहणाऱ्या भारतीयांना कायद्याचे पालन करण्याचा सल्ला दिला होता. तसेच, त्यांनी अनेकदा परदेशात भारतीयांवर होणाऱ्या दुर्लक्षिततेविरोधात आवाज उठवला होता.

सुखी चहल यांचा मृत्यू केवळ एका व्यक्तीचा नाही, तर अतिरेकी विचारसरणीविरोधात उभ्या असलेल्या एका निडर आवाजाचा अंत आहे. त्यांच्या मृत्यूमागे काही षडयंत्र असल्याची शक्यता गृहित धरून सखोल तपास व्हावा, असे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT