इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी. Pudhari File Photo.
आंतरराष्ट्रीय

Ali Khamenei Funeral Date : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनींवर तब्बल १३२ दिवसांनी होणार अंत्यसंस्कार!

अंत्यसंस्कार विधी ४ जुलैपासून सुरू होणार; ९ जुलै रोजी दफनविधी

पुढारी वृत्तसेवा

Ali Khamenei Funeral Update : २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात ठार झालेले इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्‍या पार्थिवावर तब्‍बल १३२ दिवसांनी अंत्‍यसंस्‍कार केले जाणार आहेत. खामेनींचे दफन कधी आणि कुठे करायचे, याचा निर्णय इराणी अधिकारी अद्याप घेऊ शकलेले नसल्‍याने हा विधी लांबला होता.

मशहद शहरामध्ये होणार दफनविधी

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्‍या पार्थिवावर अंत्यसंस्कार विधी ४ जुलैपासून सुरू होणार असून, ९ जुलै रोजी त्यांना दफनविधी केले जाणार आहे. सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अंत्यसंस्कार विधीची सुरुवात तेहरानमध्ये ४ जुलै रोजी होईल. देशातील ईशान्येकडील मशहद शहरात ९ जुलै रोजी त्यांना दफनविधी होईल.

दफनविधीस विलंबास सर्वात मोठे कारण 'सुरक्षा'

अयातुल्ला अली खामेनी यांच्या दफनविधी विलंबामागील सर्वात मोठे कारण 'सुरक्षा' हे सांगितले जात होते. सुरक्षा स्थिती अत्यंत संवेदनशील होती. मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक अंत्यसंस्कार केल्यास इस्रायलकडून हल्ला होण्याची किंवा देशांतर्गत अशांती पसरण्याची भीती इराणला वाटत आहे. युद्धजन्य परिस्थिती आणि सततच्या तणावामुळे कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित करणे धोक्याचे मानले जात असल्‍याने दफनविधी प्रलंबित असल्‍याचे इराणच्‍या सरकारी सूत्रांनी स्‍पष्‍ट केले होते.

गर्दीवर नियंत्रणाचे आव्हान

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण आखाती देशांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला. १९८९ मध्ये अयातुल्ला रुहोल्लाह खामेनी यांच्या निधनानंतर इराणमध्ये जनसागर लोटला होता, तशी गर्दी यावेळी पाहायला मिळालेली नाही. विश्लेषकांच्या मते, इराण सरकारला अंतर्गत विरोध आणि संभाव्य निदर्शनांची भीती आहे. मोठी गर्दी जमल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊ शकते, म्हणूनच दफनविधी टाळला जात होता.

२४ तासांत अमेरिका-इराण शांतता करारावर होणार शिक्कामोर्तब : पाकिस्तान PM शरीफ

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी म्‍हटलं आहे की, अमेरिका आणि इराणमधील शांतता करार हा समीप आला आहे. पुढील २४ तासांत त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते. शरीफ यांनी पुढे माहिती दिली की, हा करार पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्यावर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी करण्यासाठी पाकिस्तानकडून तयारी सुरू आहे.

इस्रायली लष्कराचा द. लेबनॉनमधील आणखी ४ गावांना इशारा

इस्रायली लष्कराने (IDF) हिजबुल्ला या सशस्त्र संघटनेला लक्ष्य करून केल्या जाणाऱ्या नियोजित हवाई हल्ल्यांपूर्वी दक्षिण लेबनॉनमधील आणखी चार गावांच्या रहिवाशांना परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला आहे.इस्रायली लष्कराचे प्रवक्ते कर्नल अविचाई अद्राई यांनी एका निवेदनातून रहिवाशांना प्रभावित भागातून तात्काळ बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की: "तुमच्या सुरक्षेसाठी, तुम्ही गावातील आणि शहरांमधील तुमची घरे तात्काळ रिकामी करावीत आणि 'झहरानी' नदीच्या उत्तर दिशेला निघून जावे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT