US-Iran War : अमेरिका-इराण ऐतिहासिक करार मसुदा अखेर तयार : 60 दिवसांचा युद्धबंदीचा प्रस्ताव; होर्मुझ खुली होणार

US Iran ceasefire : तेलाची निर्यात, निर्बंधांमध्ये सवलत
US Iran 60 day ceasefire proposal Strait of Hormuz reopening
Published on
Updated on

US Iran 60 day ceasefire proposal Strait of Hormuz reopening

वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील दीर्घकालीन तणाव निवळण्याची चिन्हे असून दोन्ही देशांमध्ये एका प्राथमिक कराराचा मसुदा तयार झाला आहे. आखातातील एका विश्वासार्ह वृत्तवाहिनीने या कराराच्या अंतिम मसुद्याची प्रत मिळवल्याचा दावा केला असून यामध्ये दोन्ही देशांनी अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सहमती दर्शवली आहे.

60 दिवसांची युद्धबंदी, होर्मुझ खुली होणार

या प्राथमिक करारानुसार, दोन्ही देशांमध्ये पुढील 60 दिवसांसाठी युद्धबंदी लागू केली जाईल. ती परस्पर संमतीने वाढवता येऊ शकते. तसेच जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय जहाजांसाठी पुन्हा खुली करण्यात येईल. या मार्गावरून तेलवाहू जहाजांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सुरक्षित प्रवास करता येईल. इराण पुढील 30 दिवसांत या भागातील सागरी अडथळे आणि सुरुंग हटवण्यास तयार झाला आहे.

तेलाची निर्यात, निर्बंधांमध्ये सवलत

या कराराच्या मोबदल्यात अमेरिकेने इराणवरील आर्थिक निर्बंध शिथिल करण्याचे मान्य केले आहे. इराणला पुन्हा एकदा कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री आणि निर्यात करता येईल. अमेरिकेकडून इराणच्या बंदरांवरील निर्बंध हटवले जातील. इराणचे परदेशात गोठवलेले काही आर्थिक निधी पहिल्या टप्प्यात मुक्त केले जातील.

अणुकार्यक्रमावर चर्चा आणि प्रादेशिक शांतता

या 60 दिवसांच्या कालावधीत इराणच्या वादग्रस्त अणुकार्यक्रमावर दोन्ही देश पुन्हा दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी चर्चा करतील. याशिवाय लेबनॉनसह संपूर्ण मध्य पूर्वेतील लष्करी कारवाया थांबवून प्रादेशिक शांतता प्रस्थापित करण्यावर भर दिला जाईल.

या मुद्द्यांवर अजूनही मतभेद

मसुद्यात बहुतांश मुद्द्यांवर सहमती झाली असली, तरी दोन मुख्य विषयांवर अजूनही वाद सुरू आहेत:

1. होर्मुझ सामुद्रधुनीवरील सार्वभौमत्व : आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या क्षेत्रावर आपले सार्वभौम हक्क असल्याचा दावा इराणने केला आहे. त्यावर अजून चर्चा सुरू आहे.

2. अमेरिकन लष्कराची उपस्थिती : इराणच्या सीमेनजीक असलेल्या अमेरिकन लष्करी तळांच्या सुरक्षेबाबत अद्याप दोन्ही देशांमध्ये मतभेद कायम असून यावर अंतिम निर्णय झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news