पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल जवाहिरी याचा मृत्यू झाला असल्याची चर्चा होती. मात्र ताे जिंवत असल्याचा पुरावा पुन्हा एकदा समोर आला आहे. अल जवाहिरी याचा एक व्हिडिओ जारी झाला असून, त्याने अमेरिकेला धमकी दिली आहे. अमेरिकेवर झालेल्या ९/११ दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनी अल जवाहिरी याचा ६० मिनिटांचा व्हिडिओ जारी झाला आहे.
ओसामा बिन लादेन हा ठार झाल्यानंतर अल कायदा या दहशतवादी संघटनेची म्होरक्या म्हणून जवाहिरी याची निवड झाली होती.
मागील काही वर्ष तो गायब होता. नोव्हेंबर २०२०मध्ये त्याचा दीर्घ आजाराने मृत्यू झाल्याचे मानले जात हाेते. मात्र अल कायदाने याबाबत खुलासा केला नव्हता.
यानंतर जवाहिरी याचा कोणताही व्हिडीओ समोर आला नव्हता.
तसेच याच्या ठावठिकाणी बद्दलही माहिती उजेडात आली नव्हती.
११ सप्टेंबरला त्याचा एका व्हिडिओ जारी झाला आहे.
या व्हिडिओमध्ये जवाहिरी याचा प्रकृती ठीक असल्याचे स्पष्ट होत आहे.
तसेच या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले आहे की, अमेरिकेवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी आपले सर्वस्व देणार्या १९ जणांना आपण कधीच विसरु नये. आम्ही अमेरिकेवर असा हल्ला केला त्याची आजही जखम ताजी आहे. आम्ही अमेरिकेच्या मनावरच हल्ला केला हाेता.
विशेष म्हणजे या व्हिडिओमध्येत जवाहिरी याने अफगाणिस्तानचा केवळ एक वेळा उल्लेख केला आहे.
त्याने म्हटले आहे की, २० वर्षापूर्वी अमेरिकेवरहल्ला केला. या हल्ल्यात अमेरिका मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला. त्यामुळे आता अमेरिकेला अफगाणिस्तानमधून पलायन करावे लागले आहे.
अमेरिकेच्या मोस्ट वॉन्डेट यादीत जवाहिरीचा समावेश आहे. त्याची माहिती देणार्याला अमेरिकेने अडीच कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या हत्येचा आरोप त्याच्यावर आहे.
त्याचा आजारपणात मृत्यू झाल्याचे मानले जात होते. मात्र आता त्याचा व्हिडिओ जारी झाला आहे.
आता त्याचा ठावठिकाणा शोधण्याचे आव्हान अमेरिकेसमोर असणार आहे.
हेही वाचलं का?
व्हिडिओ