Afghanistan Drone Attack Pakistan PUDHARI
आंतरराष्ट्रीय

Afghanistan Drone Attack Pakistan: बदला घेतला! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर ड्रोन हल्ला... बलुचीस्तान केलं टार्गेट

Anirudha Sankpal

Afghanistan Drone Attack Pakistan: अफगाणिस्तानने पाकिस्तानचा बदला घेतला असून अफगाणिस्तानच्या वायू सेनेनं बलुचीस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर ड्रोन हल्ला केला आहे. अफगाणिस्तानचे म्हणणे आहे की त्यांनी ISIS च्या दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.

अफगाणिस्तानने सांगितंल की, या ठिकाणांचा वापर काही शत्रू इंटेलिजेन्स ग्रुपच्या मदतीनं अफगाणिस्तानविरूद्ध हल्ला, कट आणि कोऑर्डिनेट करण्यासाठी वापर होते. या ठिकाणांवरून पूर्वी देखल हल्ल्याचे प्लॅनिंग करण्यात आले होते. दहशतवाद्यांना लाँच करण्यासाठी ऑपरेशनल बेस म्हणून याचा वापर केला जात होता.

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान सातत्याने अफगाणिस्तानच्या रहिवाशी भागात हल्ले करत होता. त्याचवेळी अफगाणिस्तानने याचा बदला घेतला जाईल असं सांगितलं होत.

अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्र्यांनी ट्विट केलं की, अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमीरातच्या संरक्षण मंत्रालयाच्या वायू सेनेने पाकिस्तानच्या बलुचीस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात ISIS च्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या ठिकाणांचा वापर हा अफगाणिस्तानविरूद्ध हल्ल्याचे प्लॅनिंग आणि कोऑर्डिनेट करण्यासाठी करण्यात आला होता.

अफगाणिस्तान तालिबाननुसार यापूर्वी अनेक जीवघेण्या हल्ल्याचे प्लॅनिंग आणि ते लाँच करण्यासाठी याच ठिकाणांचा वापर केला गेला होता. संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्यात किला अब्दुल्ला डिस्ट्रिक्टच्या गुलिस्तान भागाला टार्गेट करण्यात आले होते. त्याचबरोबर बलुचीस्तान भागातील चगाई जिल्ह्यातील शकर अप जंगल गार्डी भागात देखील हल्ले करण्यात आले. या ठिकणांचा वापर ISIS चे दहशतवादी आणि दुसऱ्या शत्रूंद्वारे केला जात होता. या ठिकाणांवर अफगाणिस्तानने यशस्वीरित्या हल्ला केला आहे.

याचबरोबर खैबरच्या ओरकजई एजन्सीच्या कंबर खेल भागातील एका ISIS खोरासानच्या अड्यांवर देखील हल्ला करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार या ऑपरेशनमध्ये जी ठरवलेली ठिकाणे होती त्या सर्वांना टार्गेट करण्यात यश आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT