Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानचा अफगाणिस्तानमध्ये नरसंहार... आत घुसून ११ निष्पाप मुलांना केलं ठार

Pakistan Afghanistan Conflict
Pakistan Afghanistan Conflictpudhari
Published on
Updated on

Pakistan Air Stike In Afghanistan: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरचा तणाव पुन्हा एकदा विकोपाला गेला आहे. अफगाणिस्तानने दावा केला आहे की पाकिस्तानने आमच्या सीमेत घुसून हल्ले केले आहेत. त्यात १३ नागरिकांचा मृत्यू झाला असून यात ११ निष्पाप मुलांचा समावेश आहे. तसेच मृतांमध्ये एक महिला आणि एका बुजुर्ग व्यक्तीचा देखील समावेश आहे. अफगाणिस्तान सरकारनं या कारवाईचा कडक शब्दात निषेध केला असून हा आंतरराष्ट्रीय नियामांचे उल्लंघ असल्याचा दावा केला आहे.

Pakistan Afghanistan Conflict
Pakistan threat |".. तर मुंबई, नवी दिल्लीवर हल्ला करू" : पाकिस्तानच्या माजी राजदूताने ओकली भारताविरोधात गरळ

निष्पाप नागरिकांना केलं टार्गेट

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवर पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ९ जूनच्या रात्री पाकिस्तानी सैन्याकडून फायटर जेट्सने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी फायटर जेट्सनी हा हल्ला अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून केला. त्यांनी निष्पाप नागरिकांना टार्गेट केल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे.

या हवाई हल्ल्यात महिला आणि मुलांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबीऊल्लाह मुजाहिद यांनी याबाबत एक वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी पाकिस्तानी हल्लेखोर लष्कराने काल रात्री पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वार उघडपणे हल्ला केला आहे.

Pakistan Afghanistan Conflict
Pakistan Threat Attack Kolkata: भारताने हल्ला केला, तर आम्ही थेट कोलकात्यावर हल्ला करू!" पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची धमकी

अफगाणिस्तानच्या तीन ठिकाणांवर हल्ला

जबीउल्लाह यांनी सांगितलं की पाकिस्तानी फायटर जेट्सनी अफगाणिस्तानच्या कुनार, खोस्त आणि पक्तिका या रहिवासी भागात हल्ला केला. इथे राहणाऱ्या सामान्य नागरिकांवर बेछुट बॉम्ब वर्षाव केला. यात अनेक घर उद्ध्वस्त झाले आहेत.

या हल्ल्यात मोठं जीवित आणि आर्थिक नुकसान झालं आहे. या बॉम्बवर्षावात एकूण १३ लोकांचा जीव गेला असून यात ११ निष्पाप मुलांचा समावेश आहे. याचबरोबर या हल्ल्यात १४ लोकं गंभीर जखमी झाले आहेत. यात महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे.

जखमींना जवळच्या रूग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. त्यांची परिस्थिती नाजूक आहे. सोशल मीडियावर या हल्ल्यानंतरच्या काही भीषण फोटो देखील व्हायरल होत आहेत.

Pakistan Afghanistan Conflict
Rashid Khan On Kabul Airstrike: रमजानचा महिना.. हल्ला मुद्दाम केला, चुकून झाला तरी... पाकच्या हल्ल्यानंतर राशीद स्पष्टच बोलला

अफगाणिस्तानने केला निषेध

या हल्ल्याचा अफगाणिस्तान सरकारनं कडक शब्दात निषेध केला आहे. प्रवक्ता जबीऊल्लाह मुजाहिदने याची निंदा करताना आम्ही या या अमानवीय गुन्हा आणि हल्ल्याचा कडक शब्दात निषेध करतो.' अस वक्तव्य केलं. अफगाणिस्तानने हा आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आणि सामान्य नागरिकांविरूद्धचा एक क्रुर अपराध संबोधलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news