१३ जुलै रोजी पेनसिल्व्हेनिया येथील निवडणूक प्रचार सभेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. (Image- X)
आंतरराष्ट्रीय

Donald Trump Attack | निशाणा थेट ट्रम्प यांच्या मस्तकावर पण..., अंगावर शहारे आणणारा Video एकदा बघाच

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : १३ जुलै रोजी पेनसिल्व्हेनिया येथील निवडणूक प्रचार सभेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. ट्रम्प याच्यावर २० वर्षीय तरुण थॉमस मॅथ्यू क्रूक्स याने गोळ्या झाडल्या. सुदैवाने ट्रम्‍प या प्राणघातक हल्‍ल्‍यातून थोडक्‍यात बचावले. पण त्‍यांच्‍या उजव्या कानाला गोळी चाटून गेली. दरम्यान, ट्रम्प यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचे एक क्लोज-अप फुटेज समोर आले आहे. त्यात हल्लेखोराचा निशाणा ट्रम्प यांच्या डोक्याच्या मध्यभागी थेट मस्तकावर होता. पण ट्रम्प यांनी भाषण करताना डोके एका ठिकाणी स्थिर न ठेवता ते दुसरीकडे वळवल्याने हल्लेखोराचा निशाणा चुकल्याचे दिसून येते.

C3PMeme द्वारे चित्रित केलेल्या या व्हिडिओमध्ये ट्रम्प त्यांचे डोके वळवत असल्याचे दिसतात. या त्यांच्या हालचालीमुळे त्यांच्या डोक्यावर मधोमध हल्लेखोराने धरलेला निशाणा चुकला. इस्रायली स्पेशल ऑपरेशन्सचे दिग्गज आरोन कोहेन यांनी यापूर्वी फॉक्स न्यूजशी बोलताना सांगितले होते की गोळी त्यांच्या कवटीला लागण्याऐवजी कानाला चाटून गेली.

ट्रम्प यांनी डोके वळवले अन्...

पेनसिल्व्हेनियाच्या प्रचार सभेत ट्रम्प यांच्यावर झालेल्या हत्येच्या प्रयत्नादरम्यान ही केवळ एक स्प्लिट-सेकंड चाल होती ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. जेव्हा थॉमस मॅथ्यू क्रुक्सने गोळ्या झाडल्या तेव्हा ट्रम्प यांनी थोडेसे डोके वळवून जंबोट्रॉनकडे पाहिले. या त्यांच्या हालचालीमुळे ट्रम्प यांच्यावरील जीवघेणा निशाणा चुकला आणि ते हल्ल्यातून बचावले.

हा तर चमत्कार! ट्रम्प यांना देवाने वाचवले- नेटिझन्स

या व्हिडिओवर नेटिझन्सनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “त्यांनी डोके हलवणे हा एक चमत्कार आहे.” दुसऱ्या एका यूजरने लिहिले, “त्या दिवशी ट्रम्प यांना देवाने वाचवले. तर आणखी एका म्हटले आहे की, “हा एक प्रोफेशनल स्निपर होता. वॉटर टॉवरवरुन त्या दिवशी लोकांनी घेतलेले हजारो व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे. टॉवरमधून अनेक व्हिडिओ शॉट्स नोंदवले गेले.'' 'हे असे घडले यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही." अशी कमेंट एका युजरने केली आहे.

'सर्वात भाग्यवान माणूस जिवंत आहे'

"हे एखाद्या देवदूताने त्याच्या कानात कुजबुजल्यासारखे आहे... मान हलवा!!" असे एकाने म्हटले आहे. “हे किती जवळ आहे हे मी प्रत्येक वेळी जेव्हा पाहतो तेव्हा माझ्या पोटात गोळा येतो. दैवी हस्तक्षेप हे एकमेव यावरील स्पष्टीकरण आहे,” अशी एकाने प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्याने लिहिले, “केवळ देवाच्या कृपेने ट्रम्प यांच्या कुटुंबासाठी ही दुःखदायक घटना ठरली नाही.” एकाने म्हटले आहे, "एकतर सर्वात भाग्यवान माणूस जिवंत आहे किंवा यामागे दैवी हात आहे.''

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT