bollywood star yoga  
Latest

International Yoga Day : शिल्पा शेट्टी ते मलायकापर्यंत योगा पाहा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक योग दिवस २०२२ (International Yoga Day) च्या निमित्ताने बॉलीवूड आणि टेलिव्हिजनच्या कलाकारांनी योगासने करून फिट राहण्याचा सल्ला दिला आहे. स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये नेहमी योगासने कलाकार करताना दिसतात. शूटिंग करताना अभिनेत्री स्वत:च्या फिगरची विशेष काळजी घेतात. त्या स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे योगासने आणि व्यायाम करतात. त्याचप्रमाणे आपल्या सामान्य जीवनात योगासनही तितकेच महत्त्वाचे आहे. बॉलीवूड सेलिब्रिटी याला त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग मानतात. ते आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत, त्यांना पाहून आपणही आपली जीवनशैली बदलू शकतो. (International Yoga Day)

आज देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत सिनेविश्वातील तारेही योग दिनानिमित्त योगदिन साजरा करत आहेत. त्याचबरोबर अनेक स्टार्सनी सोशल मीडियावर फिटनेसचे फोटो शेअर करून योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपल्याला प्रेरणा देण्यासाठी एक चांगले उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहेत. ज्यामध्ये आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी, दीपिका पदुकोण, सारा अली खान, मलायका अरोरा, करीना कपूर, सुष्मिता सेन आणि अशा अनेक सेलिब्रिटींनी योगा करून फोटो पोस्ट केले आहेत.

शिल्पा शेट्टी

आपल्या डान्सने यूपी बिहारला थक्क करणारी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि फिगरसाठी प्रसिद्ध आहे. ही अभिनेत्री ४० वर्षांची झाली आहे. शिल्पाचा फिटनेस तरुण अभिनेत्रींच्या फिटनेसला टक्कर देतो. आज योग दिनानिमित्त तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मलायका अरोरा

मलायका अरोरा एकदम फिट आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती अनेकदा योगा आणि व्यायाम करताना दिसते. या वयातही अभिनेत्री आपल्या फिटनेसने मोठ्या स्टार्सशी स्पर्धा करते. आज योग दिनानिमित्त मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या पोजेस करताना दिसत आहे.

अक्षरा सिंह

भोजपुरीची शेरनी म्हटल्या जाणार्‍या अभिनेत्री अक्षरा सिंहनेही योग दिनाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती योगा करताना दिसत आहे. तिच्या सौंदर्याचे रहस्य म्हणजे ती रोज योगा करते. फोटो शेअर करण्यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'योगाला तुमच्या आयुष्याचा अत्यावश्यक भाग बनवा, निरोगी रहा, मस्त राहा.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT