India's Space Mission 
Latest

India’s Space Mission : अंतराळ मोहिमांमधून आर्थिक फायदे मिळवण्याची भारताची क्षमता; मोदींच्या मनातही तेच; ISS च्या माजी कमांडरचा दावा

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : India's Space Mission : भारताने विविध अंतराळ मोहिमेच्या माध्यमातून स्वतःला एका मजबूत स्थिती पोहोचवले आहे. या अंतराळ मोहिमांच्या माध्यमांतून भारत मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आणि आर्थिक फायदे मिळवू शकतो. तसेच भारतीय लोकांना अंतराळ मोहिमांसाठीच्या व्यवसायातून नफा कमावण्यासाठी निश्चितच होणार आहे. असा दावा, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे माजी कमांडर आणि अपोलो मर्डर्सचे लेखक क्रिस हेडफील्ड यांनी केला आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात देखील हीच गोष्ट आहे, असे देखील क्रिस यांनी म्हटले आहे.

चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताने सूर्य मोहिमेसाठी आदित्य L1 चे यशस्वी प्रक्षेपण (India's Space Mission) केले आहे. या आदित्य L1 मिशनवर हेडफील्ड यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, आम्ही आमच्या एका जीवनकाळापेक्षा कमी वेळेत आम्ही जीपीएस उपग्रह, हवामान उपग्रम, दूरसंचार, चंद्र अभियान, सूर्य अभियान सर्वच पाहिले आहेत. आता अंतराळात धावण्याच्या शर्यती नाहीत. तर या तंत्रज्ञानाचा वापर करून अंतराळ मोहिमांआधारित व्यवसायांना आर्थिक फायद्यांमध्ये कोण बदलू शकतो, याची भविष्यात स्पर्धा असणार आहे. याचे फायदे या स्पर्धेत सहभागी सर्वच देश आणि कंपन्यांना मिळू शकतात. भारताने या क्षेत्रात आपले प्रमुख आणि मजबूत स्थान निर्माण केले आहे.

India's Space Mission : असे दिसते की, पीएम मोदींच्या मनात अनेक वर्षांपासून हे सर्व होते

हॅडफिल्ड म्हणाले की, 'मला वाटते की ही गोष्ट अनेक वर्षांपासून पंतप्रधान मोदींच्या मनात होती. ते थेट भारतातील अंतराळ आणि संशोधन संस्थांच्या प्रत्येक कार्यक्रमात थेट सहभागी होतात. यावेळी हे योग्य आणि स्मार्ट पाऊल असल्यासारखे दिसते. ते या क्षेत्राचा विकास करत आहेत आणि त्याचं खाजगीकरणही करत आहेत. यामुळे व्यवसायांना फायदा होईल आणि त्यामुळे भारतीय लोकांना फायदा होईल.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT