Latest

Indian Student Pilot : फिलिपाईन्स येथे विमान दुर्घटनेत मोर्शीच्या शिकाऊ पायलटचा मृत्यू

सोनाली जाधव

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी  येथील राधाकृष्ण कॉलनी येथे राहणाऱ्या एका २० वर्षीय युवकाचा फिलिपाइन्समध्ये विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाल्याची घटना  घडली. राधाकृष्ण कॉलनी येथे राहणारा अंशुम राजकुमार कोंडे (वय २०) हा फिलिपिन्स येथे पायलट म्हणून प्रशिक्षण घेत होता. (Indian Student Pilot)

Indian Student Pilot : त्याची पायलट व्हायची इच्छा अपुरी 

प्रशिक्षणा दरम्यान फिलिपिनो पायलट एडझेल जॉन लुम्बाओ ताबुझो आणि मोर्शी येथील अंशुम राजकुमार कोंडे हा टू सीटर इको एअर सेसना १५२ या लहान विमानाने शिक्षण घेत असताना ते विमान मंगळवारी (दि.१) दुपारी बेपत्ता झाले. या दुर्घटने नंतर अपायाओ प्रांतात बुधवारी या दुर्घटनाग्रस्त विमानाचा व दोन्ही वैमानकांचा मृत्यू झाला असल्याची तेथील अधिकाऱ्यांनी पुष्टी केली.  मंगळवारपासून या अपघातग्रस्त विमानाचा तपास तेथील यंत्रणा करीत होती. आज या विमानाचा शोध लागला असून तशी माहिती अंशुम याचे वडील राजकुमार कोंडे यांना संबंधित विभागाकडून देण्यात आली. अंशुम याने श्री. आर आर लाहोटी विज्ञान महाविद्यालयामधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्याची पायलट व्हायची पूर्वीपासूनच इच्छा असल्याचे त्याचे वडिलांनी सांगितले. तो २० एप्रिल रोजी मोर्शीला आला होता व तीच त्याच्या नातलगा सोबतची शेवटची भेट ठरली.
 अंशुम याच्या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्याच्या पश्चात आई वडील,दोन बहिणी, एक भाऊ असा मोठा परिवार आहे. एका कर्तबगार तरुणांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT