Women Asia Cup 2022 
Latest

Women Asia Cup 2022 : महिला आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ आठ खेळाडू पहिल्यांदाच स्पर्धा खेळणार

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शेफाली वर्मासह भारतातील अनेक खेळाडू प्रथमच या स्पर्धेत खेळणार आहेत. या स्पर्धेला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. अखिल भारतीय महिला निवड समितीने ACC महिला T20 चॅम्पियनशिप 2022 साठी भारतीय संघाची घोषणा केली. (Women Asia Cup 2022)

1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान बांग्लादेश येथील सिल्हेत येथे होणाऱ्या स्पर्धेत भारताची आक्रमक फलंदाज हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करणार आहे. शेफाली वर्मा, रिचा घोष, स्नेह राणा, डी हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, राधा यादव आणि केपी नवगिरे या खेळाडू पहिल्यांदाच महिला आशिया चषक खेळणार आहेत.  तर, तान्या भाटिया, सिमरन दिल बहादूर यांना राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी महिला आशिया चषक 2022 च्या आठव्या आवृत्तीचे वेळापत्रक जाहीर केले. (Women Asia Cup 2022)

1 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यू.ए.ई. आणि बांग्लादेश हे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे यजमानपद बांग्लादेशकडे आहे. हे सामने बांग्लादेशातील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध 1 ऑक्टोबर रोजी सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

जय शाह म्हणाले की, आशिया चषक स्पर्धेत प्रथमच सात संघ सहभागी होत आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले, इतिहासात प्रथमच 7 महिला संघ राऊंड रॉबिन पध्दतीने या स्पर्धेत खेळणार आहेत. या स्पर्धेत फक्त महिलाच सहभागी होतील. पंचांपासून ते अधिकृतपर्यंत व्यत्त्की या महिलाच असणार आहेत.

भारतीय संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, सबीनीन मेघना, रिचा घोष (डब्ल्यूके), पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, केपी नवगिरे

राखीव खेळाडू : तान्या सपना भाटिया, सिमरन दिल बहादूर

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT