नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारताच्या सिमारेषांवर सातत्याने घुसखोरी करणाऱ्या चीननं पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशातून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे. पण, चीनचा हा प्रयत्न भारतीय सैनिकांनी (Indian Army) हाणून पाडला आहे.
ही कारवाई करत असताना भारतीय सैनिकांनी (Indian Army) चीनच्या काही सैनिकांना ताब्यात घेतलेलं होतं. चीनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये घुसखोरी केली आणि तिथल्या सीमेवरील रिकाम्या बंकर्सना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता.
या घुसखोरी करणाऱ्या चीनच्या सैनिकांची संख्या ही २०० होती. पण, भारतीय सैनिकांनी भारतीय लष्करांना हाणून पाडला. समोर आलेली माहिती अशी की, मागील आठवड्यात नियंत्रण रेषेच्या जवळील बुम ला आमि यांग्त्से येथे घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी सैनिकांनी नियंंत्रण रेषेवर भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. याला भारतीय लष्करानंही प्रत्युत्तर दिले आणि त्यातील काही चिनी सेैनिकांना तात्पुरतं ताब्यात घेतलं.
चिनी सैनिकांना ताब्यात घेतले आणि स्थानिक सैन्य कमांडर स्तरावरील एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर चिनी सैनिकांना सोडण्यात आलं. पण, या घटनेवर अजूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. या घटनेत कोणतंही नुकसान पोहोचले नाही, अशीही माहिती समोर आली आहे.
पहा व्हिडीओ : नवरात्रीची मंगलमय सुरुवात करुया महिषासुरमर्दिनी स्तोत्राने