India-Pakistan, Bangladesh Border 
Latest

India-Pakistan, Bangladesh Border: फाळणीनंतर प्रथमच पाकिस्तान, बांगलादेशच्या ‘सीमा’ होणार सुरक्षित-अमित शहा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: फाळणीनंतर प्रथमच भारताने पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या 'सीमा' सुरक्षा संदर्भात योजना आखण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात पाकिस्तान आणि बांगलादेशसोबतच्या देशाच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित असेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ५९ व्या स्थापना दिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते बोलत होते. (India-Pakistan, Bangladesh Border)

अमित शहा म्हणाले की, भाजप २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सुमारे ५६० किमी अंतरावर कुंपण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुढील २ वर्षांत या दोन्ही देशांच्या सीमेवरील सुमारे ६,३८६ किमी लांबीचे कुंपण जोडण्यासाठी योजना आखण्यात येत आहे. (India-Pakistan, Bangladesh Border)

India-Pakistan, Bangladesh Border: सीमांवर कुंपण उभारण्यातील आव्हाने

भारत-पाकिस्तानमधील २२९० किमी आणि भारत-बांग्लादेशमधील सुमारे ४०९६ किमी पसरलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर भेडसावणाऱ्या आव्हानांवर शहा यांनी भाष्‍य केले. नदी, सीमेवर डोंगराळ भाग आणि दलदलीच्या भागांसह वैविध्यपूर्ण भूप्रदेश आहेत. ज्यामुळे कुंपण उभारणे आव्हानात्मक होत आहे. घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफ आणि इतर एजन्सीद्वारे या सीमाभागात तांत्रिक उपकरणे वापरणे हे देखील आव्हानात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (India-Pakistan, Bangladesh Border)

अमित शहा यांच्याकडून बीएसएफ जवानांच्या प्रयत्नांची प्रशंसा

अमित शहा यांनी विविध राष्ट्रीय कामगिरीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला दिले. तसेच त्‍यांनी 'बीएसएफ'च्या प्रयत्नांची प्रशंसा देखील केली.  बीएसएफ जवानांचे महत्त्व आणि त्यांची वचनबद्धता अधोरेखित केली. या दोन्ही देशांतील आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुंपण उभारणे फायद्याचे ठरेलच; पण देशाचे रक्षण शूर बीएसएफ जवानच करू शकतात, असेही  शहा यांनी सांगितले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT