नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुंबई येथे इंडिया आघाडीच्या (India Alliance) दोन दिवसीय बैठकीला गुरुवार (दि.३१)पासून प्रारंभ झाला आहे. या बैठकीच्या निमित्ताने एमजी रोडवरील काँग्रेस भवन येथे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटप करून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. इंडिया आघाडीच्या विजयाच्या घोषणा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
इंडिया आघाडीच्या (India Alliance) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट, डाव्या आघाडीच्या पक्षांच्या विविध झेंड्यांनी संपूर्ण परिसर व्यापून टाकला होता. भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यात इंडिया आघाडी यशस्वी होऊन देशांमध्ये परिवर्तन होईल, असे मत शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी व्यक्त केले. तर महागाई बेरोजगारी तसेच धर्मांध शक्तीला बाहेर करण्यासाठी इंडिया आघाडी महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गजानन शेलार, सेनेचे (उबाठा) सुधाकर बडगुजर, सीटूचे डॉ. डी. एल. कराड आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुल दिवे, विलास शिंदे, वत्सला खैरे, आशा तडवी, देवानंद बिरारी, गोकुळ पिंगळे, महेंद्र बडवे, ऋषी वर्मा, हनिफ बशीर, अल्तमश शेख, स्वाती जाधव, सुनील मालुसरे, राजू देसले, ज्ञानेश्वर काळे, समिना पठाण, दाऊद शेख, जावेद इब्राहिम, हिसाक कुरेशी, अक्षत भामरे, अदनान शेख आदी उपस्थित होते.
हेही वाचा :