Latest

IND vs WI : भारताविरुद्ध कसोटीसाठी ब—ेथवेटकडे नेतृत्व

Shambhuraj Pachindre

अँटिग्वा; वृत्तसंस्था : भारताविरुद्ध 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विंडीजचा संघ सराव शिबिर घेत असून, यासाठी तूर्तास त्यांनी 18 खेळाडूंचा प्राथमिक संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व कसोटी स्पेशालिस्ट क्रेग ब—ेथवेटकडे सोपवले गेले आहे. हे शिबिर शुक्रवारपासून अँटिग्वा येथे सुरू होत असून, त्यानंतर विंडीज संघ दि. 9 जुलै रोजी डॉमिनिकाला रवाना होईल. उभय संघांतील पहिली कसोटी दि. 12 जुलैपासून डॉमिनिका येथेच खेळवली जाणार आहे. दुसरी कसोटी दि. 20 जुलैपासून त्रिनिदादमधील क्वीन्स पार्क ओव्हलवर होईल. (IND vs WI)

त्यानंतर दोन्ही संघांत 3 वन-डे लढती होत असून, यातील पहिली लढत दि. 27 जुलै रोजी होणार आहे. पुढे दोन्ही संघ टी-20 मालिकेतदेखील आमने-सामने येणार असून, या मालिकेला दि. 3 ऑगस्टपासून प्रारंभ होईल. (IND vs WI)

कॅरेबियन भूमीत भारताविरुद्ध होणार्‍या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी पूर्वतयारी शिबिरासाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा निवड समितीने केली आहे, असे क्रिकेट वेस्ट इंडिजने ट्विट केले. विंडीजचा संघ सध्या आयसीसी पात्रता फेरीतही खेळत असून, यामुळे काही वरिष्ठ खेळाडू शिबिरासाठी समाविष्ट केलेले नाहीत. यात जेसॉन होल्डर, अल्झारी जोसेफ, काईल मेयर्स यांचा प्रामुख्याने समावेश आहे. शिबिरासाठी समाविष्ट खेळाडूंमध्ये कॅव्हेम हॉज, अ‍ॅलिक अ‍ॅथन्झे, मॅकअ‍ॅलिस्टर यांना संधी देण्यात आली आहे. विंडीजचा संघ पात्रता फेरी स्पर्धेसाठी दि. 9 जुलैपर्यंत झिम्बाब्वेमध्ये असणार आहे.

विंडीज संघ : क्रेग ब—ेथवेट (कर्णधार), अ‍ॅलिक अ‍ॅथन्झे, जर्मेन ब्लॅकवूड, बॉनर, टी. चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवल, जोशुआ डीसिल्वा, शेनॉन गॅबि—यल, कॅव्हेम हॉज, अकिम जॉर्डन, मॅकअ‍ॅलिस्टर, किर्क मॅकेन्झी, मर्क्विनो मिंडले, अँडरसन फिलीप, रेमन रायफर, केमर रॉश, जेडेन सीलेस, जोमेल वॉरिकन.

हेही वाचा; 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT