Latest

IND Vs SA 1st T20 : भारताने आफ्रिकेला अवघ्या १०६ धावात रोखले

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेला पहिल्या टी २० सामन्यात भारताने अवघ्या १०६ धावांवर रोखले. १०६ धावांच्या मोबदल्यात भारताने आफ्रिकेच्या ८ बळी घेण्यात यश मिळवले. प्रथम गोलंदाजी घेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा प्रमुख जलद गोलंदाजांनी रोहितचा निर्णय अत्यंत सार्थ ठरवत पहिल्या तीन षटकातच ५ फलंदाजांना तंबुत धाडले. आफ्रिकेच्या पहिल्या सहा मधील चार फलंदाजांना भोपळा देखिल फोडता आला नाही. अशा प्रकारे अत्यत भेदक गोलंदाजी करत आफ्रिकेला भारताने अवघ्या धावातच गुंडाळले. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी केवळ धावा करायच्या आहेत. (IND Vs SA 1st T20 )

पहिल्या षटकात गोलंदाज दीपक चहर याने कर्णधार टेम्बा बवुमा याला त्रिफळाचित केले. टेम्बा शुन्यावर बाद झाला. त्यानंतर दुसरे षटक अश्रदीप टाकण्यासाठी आला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने अनुभवी क्विंटन डिकॉक याला चित्रफळाचित केले. त्याने केवळ एक धाव केली. पुढील पाचव्या चेंडूवर अश्रदीपने नवा फलंदाज रिली रोसो याला बोल्ड केले. तो शुन्यावर बाद झाला. यानंतर सहाव्या चेंडूवर अश्रदीपने नुकताच मैदानावर उतरलेल्या डेव्हिड मिलर याला पुन्हा शुन्यावर बोल्ड केले. अशा प्रकारे भारताने पहिल्या दोन षटकात ८ धावा देत ४ बळी घेतले. (IND Vs SA 1st T20)

तिसरे षटक टाकण्यासाठी दीपक चहर आला. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्स याने झेल देऊन माघारी परतला. तो देखील शुन्यावर बाद झाला. यांनतर ठराविक अंतरावर भारत आफ्रिकेचे बळी घेत राहिला यामुळे एक प्रकारे आफ्रिकेच्या धावा बनविण्याच्या गतीवर चांगलेच अंकुश ठेवले होते. आफ्रिकेकडून केशव महाराज याने ३५ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. यासह एडन माक्ररम याने २४ चेंडूत २५ धावा आणि वेन पारनेर याने ३७ चेंडूत २४ धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. आठ गडी गमावत आफ्रिकेने १०६ धावा बनवल्या.

भारताकडून अर्शदीप सिंग याने चार षटकात ३२ धावा देत ३ बळी घेतले. दीपक चहरने ४ षटकात २४ धावा देत २ बळी घेतले. यांना हर्षल पटेलने चांगली साथ देत ४ षटकात २६ धावा देत २ बळी घेतले. तर अक्षर पटेलला १ बळी घेण्यात यश आले. त्याने चार षटकात १६ धावा दिल्या.

टी २० वर्ल्डकपच्या दृष्टीने या मालिकेकडे सरावाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. टी २० रँकींगमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. भारतात ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत चांगल्या फॉर्मसह वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्याचा मनसुबा टीम इंडियाने आखला आहे. (IND Vs SA 1st T20 )

भारतीय संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

साऊथ आफ्रिका संघ

क्विंटन डिकॉक, टेम्बा बवुमा (कर्णधार), रिली रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, अॅनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT