Latest

IND vs AUS WC Final : फायनलसाठी खास रणनीती, ड्रेसिंग रूममध्ये काय ठरलं, जडेजा म्हणाला,….

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक सामन्याच्या अंतिम सामन्यापूर्वी माेठ्या प्रमणावर वातावरण निर्मिती होत असते. याचा निश्चितच खेळाडूवर दबाब असतो मात्र, एकदा सामना सुरू झाला की अंतिम सामनाही सर्वसाधारण सामन्या सारखाच  होताे. अंतिम सामन्यालाही आम्ही असेच सामोरे जाणार आहोत, असे भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने 'स्टार स्पोर्टस'शी बोलताना सांगितले. (IND vs AUS WC Final)

यावेळी जडेजा म्हणाला की, अंतिम सामन्‍यापूर्वी विश्वचषक जिंकलेल्या खेळाडूंनी आमच्याशी ड्रेसिंगरूमध्ये संवाद साधला. आजचा सामना अत्यंत शांतपणे खेळावा अतिरिक्त दबाव घेवू नये. असा सल्‍ला त्यांनी दिला. आम्हीही त्या प्रमाणेच अंतिम सामन्याला सामोरे जाणार आहोत.

ऑस्‍ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय

क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामना आज (दि.१९) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम होणार आहे. भारत आणि ऑस्‍ट्रेलियात यांच्‍यात होणार्‍या या महामुकाबल्‍याचा थरार अनुभवण्‍यासाठी देशातील क्रिकेटप्रेमी सज्‍ज झाला आहे. ऑस्‍ट्रेलियाने टॉस जिंकला असून, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. (IND vs AUS WC Final)

फिरकीपटूंना मदत करणारी खेळपट्टी

नरेंद्र मोदी स्टेडियमची विकेट फिरकी गोलंदाजीला मदत करण्यासाठी ओळखली जाते. आजच्‍या सामन्‍याच्‍या खेळपट्टीवर फिरकीपटूंना साथ मिळेल. प्रथम चेंडू स्‍विंग होईल. जसा खेळ चालेले तसे खेळपट्टी फिरकीपटूंना साथ मिळेल, असा अंदाज माजी क्रिकेटपटू आणि समालोचक रवी शास्‍त्री आणि हरभजन सिंग यांनी व्‍यक्‍त केला आहे. तसेच प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने २८० ते ३०० धावा केल्‍यास या लक्ष्‍याचे पाठलाग करणे आव्‍हानात्‍मक असेल, असेही त्‍यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT