पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन गडी गमावत २८९ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या १९१ धावांनी मागे आहे. (Ind vs Aus 4th test day 3)
अहमदाबादमध्ये तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने तीन गडी गमावत २८९ धावा केल्या आहेत. विराट कोहली ५९ आणि रवींद्र जडेजा १६ धावांवर खेळत आहे. भारतीय संघ पहिल्या डावात अजूनही १९१ धावांनी पिछाडीवर आहे. कोहली आणि जडेजा यांच्यात चौथ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी झाली आहे. आता रविवारी दोघांसमोरही चौथ्या दिवशी मोठी भागीदारी करून टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणायचे आव्हान आहे. (Ind vs Aus 4th test day 3)
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. उस्मान ख्वाजाने १८० आणि कॅमेरून ग्रीनने ११४ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात ४८० धावांपर्यंत मजल मारली. टॉड मर्फीने अखेरीस उपयुक्त ४१ धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाच्या ४८० धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी टीम इंडियाचे फलंदाज मैदानात उतरले. भारताची सुरुवात चांगली झाली. यानंतर रोहित ३५ आणि पुजारा ४२ धावा करून बाद झाला. शुभमन गिलने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन घडवत शतकी खेळी करत भारताचा डाव सावरला. तो १२८ धावांवर बाद झाला. यानंतर विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन गड्यांच्या मोबदल्यात २८९ धावा केल्या आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा १९१ धावांनी पिछाडीवर असून सात विकेट शिल्लक आहेत.
हेही वाचा;