Latest

IND vs AUS 2nd Test : दिल्ली कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियासाठी पीटर हँड्सकॉम्ब बनला संकटमोचक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवण्यात येत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाची फिरकी आणि मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ १६७ धावांवर बाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव पीटर हँड्सकॉम्बने सावरला. त्याने ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २५० पार करण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली. त्याने १४२ चेंडूचा सामना करत ७२ धावांची दमदार खेळी करत ऑस्ट्रेलियन संघासाठी 'संकटमोचक' म्हणून तो धावून आला.  (IND vs AUS 2nd Test)

पीटर हँड्सकॉम्बने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव

डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करत ५० धावांची भागिदारी केली. यानंतर डेव्हिड वॉर्नरच्या रुपाने ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट गमावली. तर रविचंद्रन अश्विनने एकाच षटकामध्ये लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथची विकेट पटकावली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला.(IND vs AUS 2nd Test) ट्रायव्हस हेड बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पीटर हँड्सकॉम्बने सुरूवातीला उस्मान ख्वाजा बरोबर ५ व्या विकेटसाठी ५९ धावांची भागिदारी केली. तर ट्रायव्हस हेड बाद झाल्यानंतरही हँड्सकॉम्ब मैदानावर टिकून राहिला. यानंतर त्याने कर्णधार पॅट कमिंस बरोबरही ५९ धावांची भागिदारी रचली.

पीटर हँड्सकॉम्बने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पहिला कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अॅडिलेडच्या मैदानावर खेळला होता. (IND vs AUS 2nd Test) पीटर हँड्सकॉम्ब असा खेळाडू ज्याने सुरुवातीच्या ४ कसोटी सामन्यांच्या प्रत्येक डावामध्ये ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या, अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.

अशी आहे पीटर हँड्सकॉम्बची कसोटी कारकिर्द

पीटर हँड्सकॉम्बने देशांतर्गत क्रिकेटमध्ये विक्टोरिया संघाकडून खेळण्यास सुरूवात केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळवले. हँड्सकॉम्बने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४६ सामन्यांमध्ये ८८९३ धावा केल्या आहेत. यामध्ये १९ शतक आणि ४९ अर्धशतकांचा समावेश आहे. पीटर हँड्सकॉम्ब २०१९ मध्ये आपल्या प्रियसीसोबत विवाहबद्ध झाला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून १८ कसोटी सामने, २२ एकदिवसीय सामने आणि २ टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १ शतक देखील झळकावले आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT