ओडिशामध्ये मद्य उत्पादक कंपन्यांच्या समूहावर आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापनांवर आयकर विभागाने बुधवार ६ डिसेंबरपासून कारवाई सुरु केली आहे. बेहिशेबी रोकडची मोजणी तब्‍बल ९२ तासानंतरही सुरु राहिली आहे. 
Latest

आयकर विभागाने जप्‍त केलेल्‍या काेट्यवधी रुपयांच्‍या रोकडची मोजणी ९२ तासानंतरही सुरुच

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ओडिशामध्ये मद्य उत्पादक कंपन्यांच्या समूहावर आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापनांवर आयकर विभागाने बुधवार ६ डिसेंबरपासून कारवाई सुरु केली आहे. ( Income Tax raid ) बेहिशेबी रोकडची मोजणी तब्‍बल ९२ तासानंतरही सुरु राहिली आहे. आतापर्यंत ३०० कोटींहून अधिक रुपयांची मोजणी झाली आहे. आयकर विभागाने कोणत्याही एका कारवाईत आतापर्यंत वसूल केलेली ही सर्वात मोठी रोकड मानली जात आहे.

 Income Tax raid : १७६ बॅगपैकी १४० बॅगमधील रोकड मोजली!

नोटांच्‍या मोजणीबाबत माहिती देताना 'एसबीआय'चे प्रादेशिक व्‍यवस्‍थापक भगत बेहेरा यांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले की, "आम्हाला पैशांनी भरलेल्‍या १७६ बॅग मिळाल्या आहेत आणि त्यापैकी १४० बॅगमधील रोकड मोजली आहे. उर्वरित आज ( दि.१० डिसेंबर) मोजले जातील. मोजणी प्रक्रियेत 3 बँकांचे अधिकारी आणि एसबीआयचे ५० कर्मचारी सहभागी आहेत. सुमारे ४० नोटा मोजणार्‍या मशिन आणण्यात आल्या, 25 वापरात आहेत आणि 15 बॅकअप म्हणून ठेवल्या आहेत."

 Income Tax raid : ६ डिसेंबरपासून कारवाई

ओडिशातील बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांविरुद्ध बुधावार, 6 डिसेंबरपासून छापेमारी सुरू झाली. प्राप्तिकर विभागाने नोटा मोजण्यासाठी जवळपास 40 लहान-मोठी मशिन्स बसवली आहेत. बँक आणि आयकर विभागाचे कर्मचारी सतत मशीनमधून रोख मोजत आहेत. बँकेत रोकड पोहोचवता यावी यासाठी ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून काँग्रेस नेते आणि झारखंडचे राज्यसभा सदस्य धीरज प्रसाद साहू यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. अधिकारी आता कंपनीचे विविध अधिकारी आणि त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींचे जबाब नोंदवत असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

रोकड ५०० रुपयांच्‍या नोटांमध्‍ये

आयकर विभागाने सांगितले की, आतापर्यंत २५० कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. रोख रक्कम ओडिशातील सरकारी बँक शाखांमध्ये सतत जमा केली जात आहे. जप्‍त करण्‍यात आलेल्‍या बहुतांश नोटा 500 रुपयांच्या आहेत. एका गट आणि त्याच्याशी संबंधित संस्थांविरुद्ध कोणत्याही एजन्सीच्या कारवाईत जप्त करण्यात आलेली ही सर्वाधिक रोख रक्कम आहे.

कानपूरच्या छाप्यात सापडली हाेती २५७ कोटींची राेकड

२०१९ मध्‍ये उत्तर प्रदेशातील GST इंटेलिजन्सने कानपूर येथील एका व्यावसायिकावर छापा टाकला होता. यावेळी २५७ कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. पियुष जैन नावाच्या या व्यावसायिकाकडे ही राेकड हाेती. पियुष जैन हे समाजवादी पार्टीचे नेते असल्‍याची माहितीही समोर आली होती. प्राप्तिकर विभागाने जुलै 2018 मध्ये तामिळनाडूमधील एका रस्ते बांधकाम कंपनीवर छापे टाकले होते. या छाप्यात 163 कोटी रुपयांची रोकड जप्‍त केली होती.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT