Chhattisgarh New CM : विष्णुदेव साय हाेणार छत्तीसगडचे नवे मुख्‍यमंत्री | पुढारी

Chhattisgarh New CM : विष्णुदेव साय हाेणार छत्तीसगडचे नवे मुख्‍यमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : छत्तीसगडचे नवे मुख्‍यमंत्री कोण? या प्रश्‍नाचे उत्तर अखेर विधानसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर आठव्‍या दिवशी मिळालं. राज्य भाजप कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठकी छत्तीसगडचे नवे मुख्‍यंमत्री म्‍हणून विष्णुदेव साय यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब झालं आहे, असे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे. ( Chhattisgarh New CM )

भाजपचे निरीक्षक अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम यांनी आज (दि.१०) दुपारी रायपूरमध्ये भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक घेतली. छत्तीसगड भाजपचे प्रभारी ओम माथूरही या बैठकीला उपस्थित होते. अखेर आदिवासी नेते विष्णुदेव साय यांच्‍या नावावर शिक्‍कामाेर्तब केले आहे. ( Chhattisgarh New CM ) यावेळी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, अर्जुन मुंडा आणि दुष्यंत कुमार गौतम यांच्याशिवाय छत्तीसगड भाजपचे प्रभारी ओम माथूरही उपस्थित होते.

केंद्रीय निरीक्षक सकाळी नऊच्या सुमारास रायपूरला पोहोचले. दुपारी 12 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या नावावरून आमदारांसोबत विचारमंथन सुरू झाले. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर अखेर शिक्‍कामाेर्तब झाले.

कोण आहेत विष्णुदेव साय?

२१ फेब्रुवारी १९६४ रोजी जन्‍म झालेले विष्णुदेव साय यांचे मूळ गाव छत्तीसगडमधील कुंकुरी भागातील कानसाबेलला नजीक बगिया हे आहे. राज्यात आदिवासी सामुराई समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. साय या समाजातील आहेत. १९८९ मध्ये त्यांनी बगिया गावातून ग्रामपंचायत सदस्‍य म्‍हणून म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९०  मध्ये ते सरपंचपदी बिनविरोध निवड आले होते. तापकरा विधानसभा मतदारसंघातून प्रथम आमदार झाले. छत्तीसगड स्‍वतंत्र राज्‍याची निर्मिती हाेण्‍यापूर्वी १९९० ते १९९८ या कालावधीत मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य राहिले. १९९९ मध्ये ते १३ व्या लोकसभेसाठी रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. २०२० मध्ये ते छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष झाले.

आदिवासी सामुराई समाजातील अजित जोगी यांच्यानंतर कोणीही छत्तीसगडचे मुख्यमंत्री होऊ शकले नाही. यानंतर ते खासदार आणि केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत. एवढेच नाही तर साय यांची गणना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळच्या नेत्यांमध्ये केली जाते. तसेच ते रमण सिंह यांचेही निकटवर्तीय मानले जातात. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात (२०१४-२०१९) विष्णुदेव साय यांना केंद्रात मंत्री करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आरएसएसच्या पदाचा राजीनामा दिला. (Vishnu Deo Sai)

२००९ आणि २०१४ मध्‍ये ते पुन्हा रायगडमधून खासदार झाले. २७ मे २०१४  ते २०१९ या काळात केंद्रीय पोलाद खाण, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद त्‍यांनी भूषवले. पक्षाने २ डिसेंबर २०२२ रोजी भाजप राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्य झाले. भाजपने ८ जुलै २०२३ रोजी राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य म्‍हणून त्‍यांची नियुक्‍ती केली होती.

हेही वाचा :

Back to top button