पुढारी ऑनलाईन डेस्क : सॉफ्टवेअरमधील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) सत्या नडेला (Satya Nadella) यांच्या मुलाची दुर्धर आजाराशी झुंज अखेर अपयशी ठरली. झैन नडेला (वय २६) ( Zain Nadella) याचे आज (मंगळवार) सकाळी निधन झाले. तो जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी हा दुर्धर आजाराने त्रस्त होता.
याबाबतची माहिती कंपनीने ईमेलद्वारे दिली आहे. यात म्हटले आहे की, झैन याचे निधन झाले आहे. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ स्पिरिंग यांनी झेनला संगीताची आवड होती. त्याचे हास्य आणि त्याने आपल्या कुटुंबासाठी आणि प्रियजनांना दिलेला आनंद कायम स्मरणात राहण्यासारखा आहे, असे म्हटले आहे.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ