Latest

नाशिकमध्ये भाजपपेक्षा शिवसेनेच्या नगरसेवकांची कामे सरस : खा. संजय राऊत

गणेश सोनवणे
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असली तरी गेल्या पाच वर्षात भाजपच्या नगरसेवकांपेक्षा शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेली कामे सरस आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने नाशिक शहर पवित्र करायचे असेल तर महापालिकेवर संपूर्ण बहुमताने शिवसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केले. तसेच नद्यांचे नाले होत असताना, सिडकोत नाल्यांची नदी फक्त शिवसेनाच करू शकते असे त्यांनी म्हटले.  नाशिक मनपा मध्ये भाजपाने केलेला भ्रष्टाचार काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
गॅबियन वॉल व जॉगिंग ट्रॅक तसेच विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपुजन कार्यक्रमात खा. संजय राऊत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी,  उप नेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आयोजक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गीते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे,  मतदार संघ संपर्क प्रमुख निलेश चव्हाण, दिपक बडगुजर, माजी नगरसेवक शामकुमार साबळे, दिपक दातीर, मधुकर जाधव,  माजी नगरसेविका हर्षा बडगुजर, हर्षदा गायकर, शोभा मगर, श्यामला दीक्षित सुवर्णा मटाले, शितल भामरे, संजय भामरे, छबू नागरे, सुभाष गायधनी, अमोल जाधव, रमेश उघडे, नाना पाटील, चंद्रकांत पांडे, शिवानी पांडे, सागर देशमुख, पवन मटाले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक आयोजक प्रभागाचे नगरसेवक शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले.  शिवसेनेने दिलेला शब्द पाळला आहे. सिडकोतील पाण्याचा प्रश्न सोडवला तसेच प्रभागात १०० टक्के उघड्या विज तारा भुमिगत केल्या व ड्रेनेजची समस्या सोडवली असे बडगुजर म्हणाले.  पुढच्या काळात सिडको वासीयांना त्यांच्या घरांचा मालकी हक्क शिवसेनेचाच माध्यमातून मिळावा अशी मागणी बडगुजर यांनी केली.
कार्यक्रमात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा सत्कार आयोजक प्रभागाचे नगरसेवक शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी प्रभाग सभापती हर्षा बडगुजर, युवा नेते इंजि. दिपक बडगुजर यांनी केला. विकास कामांचे लोकार्पण शुभारंभ व भुमिपुजन कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दि पाहुन ही मनपा निवडणुकीच्या प्रचाराची सभा असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटल्या नंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT