नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याच्या वतीने आज ( दि. १३ ) देण्यात आला. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत देशाच्या बहुतांश भागात सरासरीच्या तुलनेत तापमान जास्त राहील, असे हवामान खात्याकडून चालू महिन्याच्या सुरुवातीला सांगण्यात आले होते.
(Heatwave in Four states )
प. बंगालमध्ये 17 तारखेपर्यंत, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर सागर किनारपट्टीच्या भागात 15 तारखेपर्यंत तर बिहारमध्ये 15 ते 17 तारखेदरम्यान उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. मध्य भारतातले तापमान सध्या 40 ते 42 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
पश्चिम हिमालयीन क्षेत्र, ईशान्य भारत, प. बंगाल, सिक्कीम, ओडिशा, आंध्रचा किनारपट्टीचा भाग तसेच केरळ या ठिकाणी सध्या सरासरीच्या तुलनेत तापमान 3 ते 5 अंशांनी जास्त आहे. मैदानी भागात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले तर ती उष्णतेची लाट जाहीर केली जाते. किनारपट्टीच्या भागात हेच प्रमाण 37 अंश आणि पहाडी भागात 30 अंश सेल्सिअस इतके आहे.
हेही वाचा :