Nitin Gadkari : गडकरींना धमकी देणाऱ्या आरोपीचे ‘डी’ गँग सह ‘या’ दहशतवादी संघटनेशी सुद्धा संबंध! तपासात नवीन माहिती | पुढारी

Nitin Gadkari : गडकरींना धमकी देणाऱ्या आरोपीचे 'डी' गँग सह 'या' दहशतवादी संघटनेशी सुद्धा संबंध! तपासात नवीन माहिती

पुढारी ऑनलाइन डेस्क : Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणातील नवीन माहिती आता उघड झाली आहे. आरोपी जयेश पूजारी उर्फ शाकीरचे संबंध लष्कर ए तोयबाशी आहे. तसेच या प्रकरणाचे धागे दोरे सीमेपलीकडे पर्यंत जात आहेत. दरम्यान आरोपीवर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांनी दिली आहे.

तपासात आतापर्यंत आरोपीचे पीएफआय आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध आहे, अशी माहिती समोर आली होती. मात्र, या प्रकरणाची पाळेमुळे आणखी खोलवर रुजली आहेत, असे दिसते. नवीन पुढे आलेल्या माहितीनुसार या आरोपीचे संबंध लष्कर ए तोयबाशी देखील आहेत, असे तपासात समोर आले आहे. तसेच त्याचा सीमेपलीकडील दहशतवाद्यांशी देखील संपर्क होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, आरोपी शाकीरवर युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जयेश पुजारी उर्फ शाकीर याने नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात फोन करून धमकी दिली होती. जयेश पुजारी याने बेळगाव तुरुंगातून 14 जानेवारी आणि 21 मार्चला गडकरी यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात फोन केला.

यावेळी पहिल्‍या वेळी 100 कोटी आणि दुस-यावेळी 10 कोटींची मागणी केली. खंडणी जर दिली नाही तर नितीन गडकरी Nitin Gadkari यांना जीवे मारू, असा फोन पुजारी याने केला होता. आरोपी पुजारी याचे अनेक संघटनांशी संबंधही आहेत. तसेच आता त्याच्यावर युएपीए कायद्यांतर्गत होणार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय संस्थांच्या सोबत मिळून करणार आहे, अशी माहिती नागपूर पोलीस अमितेष कुमार यांनी दिली.

हे ही वाचा :

‘नितीन गडकरी धमकी प्रकरण’, आरोपीचा दाऊद आणि पीएफआय संबंध; युएपीए कायद्यांतर्गत होणार गुन्हा दाखल

IPL 2023 : जोस बटलरच्या नावावर नवा विक्रम; कोहली, रोहित, धोनीलाही टाकले मागे

Back to top button