नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतातील जम्मू-काश्मीरमध्ये मूल्यवान लिथियमचा 59 लाख टन साठा सापडला आहे. त्याचे मूल्य जवळपास 3.3 लाख कोटी रुपये आहे. एकूण आवश्यकतेपैकी 80 टक्के लिथियम आपण सध्या चीनकडून आयात करतो. भारतात नुकताच सापडलेला लिथियम साठा चीनकडील साठ्यापेक्षा 4 पटीने अधिक आहे. देशाच्या हरित अर्थव्यवस्थेसाठी लिथियम मोठा गेम चेंजर ठरू शकतो. परिणामी, भारत आखाती देशांप्रमाणे संपन्न होण्याचे दिवस द़ृष्टिपथात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात एक टन लिथियमची किंमत 57.36 लाख रुपये आहे, हे त्यामागचे कारण! (Iithium Found In India)
भारत सध्या चीनसह दहा देशांतून लिथियमची आयात करतो. 2018 मध्ये भारताने 11 हजार 700 कोटींहून अधिक मूल्याचे लिथियम आयात केले. 2014 च्या तुलनेत सध्या भारताकडून होणार्या लिथियम आयातीचे प्रमाण 400 टक्क्यांवर गेले आहे.(Iithium Found In India)
वैशिष्ट्ये : (Iithium Found In India)
- लिथियम हा जगातील सर्वात हलका धातू आहे.
- तो चाकूने कापता येतो. पाण्यावर चक्क तरंगतो.
- उपयुक्तता : हा धातू रासायनिक ऊर्जा साठवून तिचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतो.
- 1790 : ब्राझीलमध्ये दगडाच्या स्वरूपात हे खनिज सापडले. पांढरा, राखाडी दगड आगीत टाकल्यावर लालभडक होई.
- 1817 : स्वीडनमधील शास्त्रज्ञ जॉन ऑगस्ट यांनी, त्यातील लिथियम नावाचा घटक वेगळा केला. दगडापासून बनलेला म्हणून लिथियम.
- लिथियम हा बॅटरीत वापरला जाणारा सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे.
- घड्याळे, रिस्ट वॉच, लॅपटॉप, मोबाईल फोन अशा सर्वातच हा धातू वापरला जातो.
- पांढरे सोने म्हणून याची ओळख आहे.
- जग सध्या इंधन ऊर्जेकडून हरित म्हणजेच अक्षय्य ऊर्जेकडे वळू लागलेले आहे.
- पवन टर्बाईन, सौरऊर्जा पॅनेल, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियमचा वाढता वापर.
- 2050 पर्यंत जगात लिथियम, कोबाल्टसारख्या धातूंची मागणी
- 500 टक्क्यांवर वाढलेली असेल, असे जागतिक बँकेने म्हटलेले आहे.
- 300 पीपीएम (भाग प्रती दशलक्ष) पेक्षा जास्त लिथियम कच्च्या मालात असेल, तर साठा उत्तम दर्जाचा मानला जातो.
- 800 पीपीएम ही भारतात सापडलेल्या लिथियमची गुणवत्ता आहे. प्रमाणित गुणवत्तेपेक्षा आपला साठा दुपटीहून अधिक दर्जेदार आहे.
- 1 लाख मेट्रिक टन लिथियम सध्या जगात दरवर्षी तयार होते.
- 40 पटीने उत्पादन वाढ आवश्यक, तरच मागणीला भिडणे शक्य
- बोलिव्हिया 210
- अर्जेंटिना 190
- चिली 98
- अमेरिका 91
- ऑस्ट्रेलिया 73
- भारत 59
- चीन 51
- पोर्तुगाल 27
- झिम्बाब्वे 5
- ब्राझील 4.7
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.