लाहोर; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानी अभिनेत्री उश्णा शाह (Ushna Shah) विवाहबंधनात अडकली आहे. तिने गोल्फपटू हमजा अमीनसोबत लग्न केले आहे. उश्णाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या खासप्रसंगी तिने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. गळ्यात भारी हार, भांगेत टिळा आणि हात बांगड्या भरलेला. उश्णाचा आउटफिट पाकिस्तानी डिझायनर वरदा सलीमने डिझाइन केला आहे. सोशल मीडियात उश्णावर लग्नाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. तिचा भारतीय वधूसारखा लूक असो किंवा लग्नानंतरचा डान्स, युजर्सना फारसे आवडलेले दिसत नाही. त्यामुळे तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. या ट्रोलर्सना उश्णाने सुद्धा जशाचतसे उत्तर दिले आहे. (Pakistani Actress Ushna Shah Trolled)
सहसा भारतात वधू लाल रंगाच्या कपड्यांमध्ये दिसते. अनेक युजर्सनी उश्णाच्या फोटोवर लिहिले की ती भारतीय संस्कृतीचा प्रचार करत आहे. रविवारी, ट्रोल झाल्यानंतर, उश्णाने इंस्टाग्राम स्टोरीवर प्रतिक्रिया दिली. तिने तिच्या हातावर मेंदीचा फोटो शेअर केला आणि लिहिले, 'ज्यांना ड्रेसची समस्या आहे त्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले गेले नाही आणि तुम्ही माझ्या लाल रंगाचे पैसे दिले नाहीत. माझा लेहेंगा, माझे दागिने, माझा पोशाख पूर्णपणे पाकिस्तानी आहे. माझे हृदय अर्धे ऑस्ट्रेलियन असले तरी. अल्लाह आम्हाला आनंदी ठेवो.' ती पुढे लिहिते, 'न बोलवता लग्नात दाखल झालेल्या छायाचित्रकारांना सलाम.'
पोशाख पाहून लोक संतापले
उश्णाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात ती तिच्या पतीसोबत लग्नात डान्स करत आहे. एका यूजरने म्हटले की, 'ते लोकांना मूर्ख बनवत आहेत. ते पाकिस्तानी संस्कृतीच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करत आहेत. आपण हे सहन करू नये, ती आपली संस्कृती, पारंपरिक मूल्ये आणि धार्मिक मूल्ये नष्ट करत आहे.' दुसऱ्या एका यूजरने लिहिले, 'शोबिझ स्टार्स भारतीय संस्कृतीपासून इतके प्रेरित का आहेत? हे भारतीय लग्नासारखे दिसते. कॉपी करायची असेल तर हॉलिवूड करा' आणखी एकाने लिहले, 'ड्रेसकोड आणि हा डान्स. हा आमचा धर्म नाही.
अधिक वाचा :