Latest

IFFI 2023 : ‘मंडली’ ही रामलीला कलाकारांच्या आव्हानांची कथा

सोनाली जाधव

पणजी : दीपक जाधव, मंडली हा चित्रपट मुन्शी प्रेमचंद यांच्या रामलीला या कथेपासून प्रेरित आहे. या चित्रपटातून मनोरंजक पद्धतीने संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन दिग्दर्शक राकेश चतुर्वेदी ओम यांनी केले. 54 व्या इफ्फी मध्ये, प्रतिष्ठेच्या आसीएफटी युनोस्को गांधी पुरस्काराच्या स्पर्धेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश चतुर्वेदी ओम आणि निर्माते प्रशांत कुमार गुप्ता यांनी शनिवारी 25 रोजी माध्यमांशी संवाद साधला. (IFFI 2023)

राकेश चतुर्वेदी ओम आणि निर्माते प्रशांत कुमार गुप्ता माध्यमांशी बोलताना म्हणाले की, एका रामलीला कलाकाराच्या जीवनामधून तत्कालीन नैतिक आणि सामाजिक मूल्यांचा शोध 'मंडली' हा चित्रपट घेतो. पारंपारिक लोककलाकारांकडून चित्रपटात चित्रपटात काम करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणांना आकर्षित करतील असे मनोरंजनाचे घटक जोडले आहेत. त्यामुळे चित्रपट अधिक प्रभावी होईल, कलाकारांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना अधिक चांगला मोबदला मिळेल. प्रशांत कुमार गुप्ता म्हणाले, चित्रपटाद्वारे रामलीलाची संस्कृती मूळ स्वरूपात पुढे नेण्याचा आपला मानस आहे. इफ्फी 54 मध्ये आसीएफटी युनोस्को गांधी पदकासाठी नामांकन मिळणे म्हणजे, त्यांच्यासाठी स्वप्न साकार झाले आहे.

IFFI 2023 : का पहावा चित्रपट?

मंडली हा चित्रपट सामाजिक विवेक कमी होत असताना आणि सांस्कृतिक आणि पारंपरिक मूल्यांचा र्‍हास होत असताना आपली नीतिमत्ता टिकवून ठेवण्याच्या नायकाच्या संघर्षमय प्रवासाचे प्रतिबिंब दर्शवते. पुरुषोत्तम चौबे उर्फ पुरू हा उत्तर प्रदेशातील मथुरा येथील एका इंटरमिजिएट महाविद्यालयात शिपाई आहे. तो त्याचे काका रामसेवक चौबे यांच्या रामलीला मंडळीमध्ये लक्ष्मणाची भूमिका करतो आणि त्याचा चुलत भाऊ सीताराम चौबे रामाची भूमिका साकारतो. सीतारामच्या अमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्यांना एका सादरीकरणा दरम्यान कार्यक्रम मधेच बंद करावा लागतो. त्यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अपमान सहन न झाल्याने आणि भगवंतांचा अवमान केल्याच्या अपराधी भावनेमुळे रामसेवक रामलीलामध्ये काम करणे कायमचे बंद करतो. पुरूच्या पलायनवादाचा रामसेवक निषेध करतो, आणि आपल्या कुटुंबाला सन्मानाने रंगमंचावर परत आणण्यासाठी संघर्षाचा प्रवास सुरू करतो.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT