दुबई, वृत्तसंस्था : भारतात होणार्या वन डे वर्ल्डकप (ODI World Cup 2023) स्पर्धेच्या बक्षीस रकमेची घोषणा करण्यात आली. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार्या या महास्पर्धेत एकूण 10 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 82 कोटी 95 लाख 82,000 रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे. विजेत्या संघाला यापैकी 4 मिलियन म्हणजेच जवळपास 33.18 कोटी रुपये दिले जाणार आहेत. उपविजेत्याला 2 मिलियन म्हणजेच 16 कोटी दिले जातील.
सर्व 10 संघ ग्रुप स्टेजमध्ये राऊंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये एकमेकांशी एकदा खेळतील, पॉईंट टेबलमधील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. ग्रुप स्टेज फेरी जिंकण्यासाठी देखील बक्षीस रक्कम आहे. प्रत्येक विजयासाठी संघांना 40,000 अमेरिकन डॉलर्स मिळतात. गट स्टेजच्या शेवटी, बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या संघांना प्रत्येकी 100,000 अमेरिकन डॉलर्स मिळेल.
अशी मिळतील बक्षिसे : (ODI World Cup 2023)
विजेता : 33.18 कोटी रुपये
उपविजेता : 16 कोटी रुपये
उपांत्य फेरीतील दोन संघ : प्रत्येकी 6 कोटी रुपये
साखळी फेरीतील संघ : प्रत्येकी 82 लाख रुपये
हेही वाचा…