Latest

हुपरी : चिकन विक्रेत्याकडून पत्नीचा तुकडे करून निर्घृण खून, थरकाप घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Shambhuraj Pachindre

हुपरी : पुढारी वृत्तसेवा : हुपरी येथे पत्नीवर सत्तूराने थंड डोक्याने, अमानुषपणे वार करीत असल्याचा व जमावाकडे बघून धारदार सत्तूर नाचवत दहशत निर्माण करत असल्याचा निर्दयी पतीचा २५ जानेवारीचा  खळबळजनक व थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इम्तियाज नदाफने बेभान होऊन आपल्या २८ वर्षीय पत्नीच्या अंगावर अनेक वार करीत असल्याचे दिसते.

रेंदाळ येथील मृत समीना नदाफ आणि कोरोचीचा इम्तियाज नदाफ यांना दोन अपत्ये आहेत. हुपरी येथे हे दांपत्य राहत होते. त्यांच्यात वाद झाला होता, त्यातून फ़ोन उचलत नाही म्हणून चिकनचा व्यवसाय करणारा इम्तियाज हा माथेफिरू अतिमद्य प्राशन करुन सोबत सत्तूर घेऊन हुपरीत समीना चालवत असलेल्या चिकन ६५ च्या गाड्याजवळ आला आणि तिच्यासोबत भांडण करत तिच्यावर सत्तूरचा वार केला. जिवाच्या आकांताने समीना रस्त्यावर पळत सुटली जीव वाचवण्याच्या हेतूने ती एका इस्त्रीच्या दुकानात घुसली.

हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो त्यामुळे येथे लोकांची गर्दी होती पण, कोणाचीही तमा न बाळगता अत्यंत शांत डोक्याने, निर्दयीपणे त्याने दुकानात घुसून समीनाच्या अंगावर मोजता येणार नाहीत एवढे वार केले. अंगाचे तुकडे करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. ही घटना पाहणाऱ्या येथील लोकांचा आक्रोश, आवाज, मृत समीनाचा जिवाच्या आकांताने फोडलेला टाहो या व्हिडिओत दिसतो.

जमलेल्या जमावामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी तो सत्तूर जमावाकडे दाखवतो आणि पुन्हा सपासप वार करीत निर्दयपणाचा कळस गाठतो. काही मंडळींनी बघ्याची भूमिका घेत आपल्या मोबाईलवर घेतलेला लाईव्ह व्हिडिओ सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडवणाऱ्या व्हिडीओमुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत, व्हिडिओ करण्यापेक्षा वाचवले असते तर असाच सुर असला तरी बेभान होऊन हातात  धारदार सत्तूर नाचवनाऱ्या या माथेफिरू आणि निर्दयी क्रूरकर्मय़ाला कोण थांबवणार ? जीवाच्या भीतीपोटी कोणीही पुढे आले नाही. मात्र या घटनेनंतर येथील तरुणांनी त्याला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT