Fighter Teaser 
Latest

Fighter Teaser : हर उडान वतन के नाम!; हृतिक -दीपिकाच्या ‘फायटर’ चा टिझर रिलीज

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि हॉलिवू़ड- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा यांचा आगामी 'फायटर' (Fighter) या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या टीझर रिलीज डेटची घोषणा करण्यात आली होती. यानुसार आज म्हणजे, शुक्रवारी (दि. ८) रोजी 'फायटर' चा टिझर ( Fighter Teaser ) रिलीज करण्यात आला आहे. याआधी चित्रपटातील हृतिक रोशन आणि दीपिकाचा धमाकेदार लूक समोर आले आहेत.

संबंधित बातम्या 

अभिनेता हृतिक रोशन यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतेच आगामी 'फायटर' (Fighter) चित्रपटाचा टिझर ( Fighter Teaser ) रिलीज करण्यात आला आहे. या टिझरमध्ये सुरूवातीला हृतिक हातात हेल्मेट घेवून पायलटच्या गनवेशात समोर आला. यानंतर एक- एक करून दीपिका पादुकोण आणि अभिनेता अनिल कपूरही पायलटच्या वेशभूषेत समोर आले आहेत. यात आकाशात सुरक्षा रक्षक वैमानिकांची लढाई दाखविण्यात आली आहे. तर चित्रपट भारतातील हवाई दलाची कहाणी आणि भारतीय लढाऊ विमानांसह चित्रित करण्यात आले आहे.

याशिवाय चित्रपटाच्या टिझरमध्ये भरपूर अॅक्शन सीन, अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, हिरवीगार डोंगर दरी, विमानतळ, जाळपोळ, फायरिंग दाखविण्यात आलं आहे. शेवटी मात्र, हृतिक विमानातून देशाचा तिरंगा झेंडा फडकवत मोहिम फत्ते झाल्याचे सांगितले आहे. या टिझरच्या कॅप्शमध्ये 'हर उडान वतन के नाम! ??' असे लिहिलं आहे.

हा टिझर सोशल मीडियावर रिलाज होताच चाहच्यांच्या पसंतीस उतरला आहे. एका तासांत २ लाखांहून अधिक जणांनी याला लाईक्स केलं आहे. धमाकेदार टिझरनंतर चाहत्यांची चित्रपटासाठी उत्सुकता वाढली आहे. 'फायटर' हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात हृतिकने स्क्वाड्रन लीडर समशेर पठानियाची तर दीपिकाने स्क्वाड्रन लीडर मीनल राठोडची भूमिका साकारली आहे. याआधी काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करत टिझर रिलीज डेटची घोषणा करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT