Latest

Serial Rapist Ravinder Kumar : पॉर्न फिल्म पाहून ३० मुलांचा बलात्कार आणि हत्या करणारा हैवान !

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्लीतील रोहिणी न्यायालयाने शनिवारी सीरियल रेपिस्ट रविंदर कुमारला ३० मुलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवले. सुमारे ३० मुलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली होती. आरोपी हा उत्तर प्रदेशातील कासगंज येथील रहिवासी आहे. त्याने दिल्ली-एनसीआर आणि पश्चिम उत्तर प्रदेश भागात गुन्हे केले होते. आरोपानुसार, आरोपीला दारू आणि अंमली पदार्थांचे व्यसन होते आणि तो मद्यधुंद अवस्थेत हे गुन्हा करत असे. तो लहान मुलांना मिठाई खाऊ घालण्याचे आमिष दाखवायचा आणि नंतर बलात्कार करून त्यांची हत्या करायचा. (Serial Rapist Ravinder Kumar)

रविंदर कुमार आपल्या टार्गेटच्या शोधात दिवसाला ४० किमी पर्यंत चालत जात असे आणि मुलावर लैंगिक अत्याचार करून त्यांचा खून करायचा. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २००८ ते २०१५ दरम्यान त्याने सुमारे ३० मुलांचा कथितरित्या खून केला होता, पीडित मुलांमध्ये सर्वात लहान फक्त दोन वर्षांचा आणि सर्वात मोठा १२ वर्षांचा होता. (Serial Rapist Ravinder Kumar)

रात्र होताच शिकारीला निघायचा (Serial Rapist Ravinder Kumar)

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एकदा त्याने सीडी प्लेयरवर दोन अश्लील चित्रपट पाहिले आणि त्यांनतर त्याच्यातला सीरियल रेपिस्ट आणि खून करणारा जनावर जागा झाला. तेव्हापासून त्याने बलात्कार आणि खूनाच्या घटना करण्यास सुरुवात केली. जेव्हा थकलेले मजूर संध्याकाळी परत येऊन आपल्या झोपडपट्टीत झोपायला गेले की रविंदर शिकारीला जायचा. रात्री ८ ते मध्यरात्रीच्या दरम्यान तो आपल्या मुलांना १० रुपयांच्या नोटा किंवा मिठाईचे आमिष दाखवून एका निर्जन इमारतीत किंवा रिकाम्या शेतात नेऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा. शोध लागण्याच्या भीतीने त्याने बहुतेक मुलांची हत्या केल्या आहेत.

२०१४ मध्ये पहिल्यांदा झाला होता अटक

कुमारला २०१४ मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. हे प्रकरण ७ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार आणि खुनाच्या प्रयत्नाचे होते. जिवे मारण्याच्या इराद्याने बलात्कार करून मुलाला सेप्टिक टँकमध्ये फेकून दिले. त्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर तो मजुरीचे काम करू लागला.

वर्षभरानंतर पुन्हा अटक

त्याला १६ जुलै २०१५ रोजी दुसऱ्यांदा अटक करण्यात आली होती. तेव्हा त्याचे वय २४ वर्षे होते. तेव्हापासून तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद आहे. एका प्रकरणात न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आहे. त्याच्या शिक्षेचा निर्णय दोन आठवड्यांत येईल. पोलिसांनी त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT