Dahi- Papad Ki Sabji  
Latest

Dahi-Papad Sabji : पापड खाण्याचा कंटाळा आलाय बनवा राजस्थानी दही-पापड

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : उन्हाळ्यात महिलांची पापड, लोणचे, तिखट बनवण्याची लगबग सुरू झाली आहे. काही ठिकाणी तर साध्या पापडापासून ते उपवासाच्या पापडापर्यतची मागणी वाढली आहे.  खास करून उडीद पापडाला पसंती मिळते; परंतु, हे पापड साठवणूक केल्यानंतर मऊ होतात आणि तेलात तळल्यानंतर चविष्ट बनतात. सारखे- सारखे जर उडीदाचे पापड खाण्‍यात आले तर मग कंटाळा येतो. अशावेळी राजस्थानी पद्धतीने चविष्ट असणारी दही- पापड रेसिपी कशी बनवाची हे पाहूयात…( Dahi- Papad Sabji )

साहित्य-

उडीदाचे पापड- ६-७
जिरे- एक चमचा
हळद- एक चमचा
लाल तिखट- एक चमचा
धने पावडर – एक चमचा
दही- एक वाटी
बारीक चिरलेला कांदा- एक चमचा
हिरवी मिरची- छोटी एक
तेल- फोडणीसाठी
पाणी- अर्धा ग्लास
मीठ- चवीपुरते
बारीक चिरलेली कोथंबीर- दोन चमचा

कृती-

१ ) प्रथम ६ ते ७ उडीदाचे पापड घेवून ते तव्यावर तेल न वापरता भाजून घ्यावेत.

२ . भाजलेले पापडाचे छोटे -छोटे तुकडे करून प्लेटमध्ये ठेवावे.

३ ) यानंतर कढाईत तेल गरम करून त्यात एक चमचा जिरे, एक हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कांदा घालून परवून घ्यावा.

४)  कांद्याला ब्राऊन कलर आल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, धने पावडर घालून हलवावे.

५ )  मसाला एकत्रित मिक्स झाल्यावर त्यात एक वाटी दही घालून हे मिश्रण चांगले परतवून घ्यावे.

६ ) दही चांगले मिक्स झाल्यावर त्यात अर्धा ग्लास पाणी आणि चवीपुरते मीठ घालावे.

७ ) या मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यात भाजलेले उडिदाचे पापडाचे तुकडे आणि बारीक चिरलेली कोंथबिर घालून १० ते १५ मिनिटे शिजवावे.

८ ) यानंतर तयार होईल राजस्थानी पद्धतीची दही- पापड भाजी. तयार भाजी तुम्ही भाकरी किंवा चपासीसोबत खावू शकता. ( Dahi- Papad Sabji )

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT